`विद्रोही कवी म्हणतात, ‘भागनेवालों की सूची उठाइए, उस पर अपनी नजर दौडाइए.. !’

भाजपचे राज्यातील प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ‘आम्ही राज्यपालांच्या या विधानाशी सहमत नाही’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Devendr Fadanvis's reaction on Governor
Devendr Fadanvis's reaction on GovernorSarkarnama

नागपूर : महाराष्ट्राच्या (Maharashtra) मुंबई, ठाण्यातून गुजराथी आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यास मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी राहणार नाही, अशा आशयाचे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी केले. त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शब्बीर अहमद विद्रोही यांनी कवितेमधून राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

राज्यपाल (Governor) भगतसिंह कोश्‍यारी (Bhagatsingh Koshyari) म्हणाले की, `कधी कधी मी महाराष्ट्रातील लोकांना म्हणतो की, महाराष्ट्राच्या मुंबई आणि ठाणे येथून गुजराथी आणि राजस्थानी लोकांना काढले तर, येथे पैसा राहणारच नाही. मुंबईला आर्थिक राजधानी म्हटल्या जाते, ही आर्थिक राजधानी राहणारच नाही.’ या वक्तव्याचे आज दिवसभर राज्यभर चांगलेच पडसाद उमटले. भाजपचे राज्यातील प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ‘आम्ही राज्यपालांच्या या विधानाशी सहमत नाही’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही अशीच प्रतिक्रिया राज्यपालांच्या वक्तव्यावर दिली आहे.

राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर कॉंग्रेसचे नेते त्यांच्यावर तुटून पडले आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी त्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही राज्यपालांना चांगलेच खडसावले आहे. आम्ही राज्यपालांच्या त्या विधानाशी सहमत नाही, असे भाजप नेत्यांनी सांगितले आहे आणि इतर पक्षांनी राज्यपालांना खडे बोल सुनावले आहेत.

नागपुरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शब्बीर विद्रोही यांनी मात्र कवितेतून राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. ‘साथियों नमस्कार..., सुनिए राज्यपाल के विचार...’, असे म्हणत त्यांनी मराठी माणसाचे महत्व पटवून देताना गुजराथी आणि राजस्थान्यांची महाराष्ट्रात काय जागा आहे, हेसुद्धा सांगितले आहे. आपल्या कवितेत ते म्हणतात...

जब भी मुंह खोलता है, उटपटांग बोलता है

आज बोला भगत सिंह कोश्यारी, फुला कर अपनी छाती

राजस्थानी और गुजराती, चले गए तो कुछ नहीं बचेगा

यह बात महाराष्ट्र को कैसे पचेगा

कोश्यारी ने बड़ी होश्यारी से, १२ एमएलसी के मामले को रोका है

संविधान के अधिकार से धोका है

अरे कुछ गुजराती, लोभ लाभ के साथी

महाराष्ट्र हर को अपना बनाता है, हर कोई महाराष्ट्र की धरती पर कमाता है

गुजराती कोई कारोबार लगाता है, हमारे खून पसीने से कमाता है

कहता है हम है देश की बोन, लेता है हजारों करोड का लोन

चुनाव में नेता को चंदा चटाते हैं, मौका देखकर विदेश भाग जाते हैं

भागने वाले की सूची उठाइए, उस पर अपनी नजर दौडाइए

इतने निर्दई की कुछ नहीं बताते, पत्नी को छोड कर भाग जाते

मुंह राज्यपाल का, भाजप की वाणी है, ऐ मेरे साथियों यही परिशानी है

महाराष्ट्र के नागरिकों, स्वाभिमान को जगाओ

झूठे पाखंडियों को, अब तो सबक सिखाओ

ऐसे मौके को विद्रोही मत गवाईए, महाराष्ट्र की गरिमा को बढ कर बचाइए

महाराष्ट्रद्रोही को सत्ता से हटाइए...!

Devendr Fadanvis's reaction on Governor
पूरग्रस्त देवाळ्याच्या विद्यार्थ्यांनी अडवली खासदार बाळू धानोरकरांची वाट...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in