Ajit Pawar : मेळघाटातले वास्तव : पदस्थापना केलेले ५० टक्के डॉक्टर गायब असतात !

५ दिवसापूर्वी मी तेथे गेलो होतो. कुपोषण आणि बालमृत्यूचा कलंक तेथे लागला आहे, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहाला सांगितले.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

नागपूर : आदिवासींच्या कुपोषणाचा प्रश्‍न फार गंभीर होत चालला आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यातील मेळघाटमध्ये तर डॉक्टर जातच नाहीत. त्यामुळे तेथे आरोग्याचे विविध प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे निसर्गाचा पूजक आज कुपोषणाच्या विळख्यात सापडला आहे, असे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज सभागृहात सांगितले.

आदिवासी लोक निसर्गालाच आपला देव मानतात. निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यावरच कुपोषणाची वेळ आली आहे. गेल्या ५ वर्षांत १६ जिल्ह्यांत ८८४२ बालक दगावली, तर १ लाखाच्या वर कुपोषित बालकं आहेत. हे होत असताना आज आपल्या क्षेत्रातील वास्तवाला सरकारकडून मान्य केले जात नाही, हे दुर्दैवी आहे. याची किंमत आदिवासी बांधवांना भोगावी लागणार आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील भोकरबर्डी येथे ५ दिवसापूर्वी मी तेथे गेलो होतो. कुपोषण आणि बालमृत्यूचा कलंक तेथे लागला आहे, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहाला सांगितले.

कुपोषणाचे कारण म्हणजे दारिद्र्य़ आणि यंत्रणेमधील समन्वयाचा अभाव. तेथे एनजीओ आणि सरकारी यंत्रणा काम करता. सरकारच्या जवळपास सर्व विभागांमध्ये पदे रिक्त आहेत. डॉक्टर कामावर येत नाहीत. पदस्थापना केलेले ५० टक्के डॉक्टर गायब असतात, याची दखल मंत्री उदय सावंत यांनी तातडीने घेतली पाहिजे. काही डॉक्टर कंत्राटी आहेत, तर काहींना पगार कमी आहे. त्यांच्या वेतनामध्ये तफावत असल्यामुळे कमी वेतन असलेले डॉक्टर मेळघाटात जात नाहीत. स्त्री आणि बालरोग तज्ज्ञांची तर वानवा आहे. निवासाची समस्या असल्याने महिला डॉक्टर मेळघाटात जायलाच तयार नाहीत, असे धक्कादायक वास्तव अजित पवार यांनी सांगितले.

Ajit Pawar
एकनाथ शिंदेंना अजित पवार म्हणाले, कधी आपल्याला एकत्र यावे लागेल सांगता येत नाही...

सरकारच्या विविध विभागांचा समन्वय सुरळीत केला तर उपाययोजना होऊ शकते. आदिवासी विभागाला जो निधी दिला जातो, त्याचा विनियोग होतो की नाही, याचा ताळमेळ ठेवला गेला पाहिजे. आदिवासींना जुलै, ऑगस्ट महिन्यातच खावटी अनुदान द्यायला पाहिजे होते, पण अजूनही त्यांना हा मदतीचा हात दिला गेला नाही. पण सरकार ही बाब मान्य करत नाही, हे दुर्दैव आहे. प्रोटीनयुक्त आहाराचा अभाव आहे, त्यामुळे कुपोषण वाढत आहे. याशिवाय अंधश्रद्धा हे दुसरे मोठे कारण आहे. एके ठिकाणी मी काळे, तांबड्या रंगांचे दोरे बघितले. त्या भगिनीला विचारलं तर तिने सांगितले की, बाबांनी दिले आहे. चटके देऊन तेथे उपचार केले जातात, हे भयावह आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in