यशोमती ठाकूर यांचा पलटवार, म्हणाल्या अनिल बोंडे विक्षिप्त वागताहेत…

या प्रकरणात भाजप नेते माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे (Anil Bonde) हे युवकांची माथी भडकवत आहेत, असा आरोप महिला व बालकल्याण विकास मंत्री व अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केला.
Yashomati Thakur and Anil bonde
Yashomati Thakur and Anil bondeSarkarnama

नागपूर : अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर येथे काही लोकांनी दुल्ला प्रवेशद्वारावर भगवा झेंडा लावला होता. त्यानंतर तेथे तणावाची स्थिती होऊन वातावरण चिघळले. आता जिल्ह्यातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागले आहेत. या प्रकरणात भाजप नेते माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे हे युवकांची माथी भडकवत आहेत, असा आरोप महिला व बालकल्याण विकास मंत्री व अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केला.

अचलपूर येथील दंगलप्रकरणी पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) याच मास्टरमाइंड आहेत, असा आरोप डॉ. बोंडे यांनी केला होता. त्याच्या प्रत्युत्तरात अनिल बोंडे (Anil Bonde) अतिशय विक्षिप्त वागत आहेत. ते कुणाच्या खुंट्याला बांधले गेले आहेत हे जनतेला माहीत आहे. अमरावती (Amravati) अशांत करण्यासाठी ते लोकांना भडकवत आहेत. स्वतःच्या मुलांना बाहेरगावी पाठवून अमरावतीमधील तरुणांचा माथी भडकवत आहेत. अमरावतीमधला सलोखा कायम राहिला पाहिजे, यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहो. पण डॉ. बोंडे वातावरण चिघळवण्याचे काम करीत आहेत. जनता त्यांना माफ करणार नाही, अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली.

परवा रात्री अचलपुरच्या दुल्ला प्रवेशद्वारावर भगवा झेंडा लावल्यानंतर लगेच सशस्त्र युवक रस्त्यांवर उतरले आणि दिसेल तेथे तोडफोड सुरू केली. त्यानंतर घटनास्थळी भेट देण्यासाठी भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी आणि जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडे गेले असता, त्यांना पोलिसांनी शहराबाहेर नाक्यावरच ताब्यात घेतले आणि आसेगाव पोलिस ठाण्यात अडवून ठेवले. अचलपुरात पोलिस पक्षपाती कारवाया करीत असल्याचा आरोप शिवराय कुळकर्णी यांनी केला.

Yashomati Thakur and Anil bonde
Video: मंत्री यशोमती ठाकूर यांची 'खदखद' मास्तरांना पक्षात येण्याची ऑफर..

दरम्यान डॉ. अनिल बोंडे यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर तोफ डागली. पालकमंत्री या दंग्याच्या मागच्या मास्टरमाइंड असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. पलटवार म्हणून पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अनिल बोंडे यांचे वागणे विक्षिप्त असल्याचा पलटवार केला. अशा या आरोप प्रत्यारोपांमुळे अमरावती जिल्ह्यातील वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com