मलकापूर अर्बन बॅंकेवर RBI चे निर्बंध, भाजप नेते चैनसुख संचेती आहेत अध्यक्ष...

खानदेश मराठवाडा Khandesh, Marathwada भागात प्रस्थ असलेल्या बँकेच्या ग्राहकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. मलकापूर Malkapur अर्बन बँकेच्या राज्यात मुख्य कार्यालय व २८ शाखा आहेत.
Malkapur Urban Bank LTD. Malkapur
Malkapur Urban Bank LTD. MalkapurSarkarnama

बुलडाणा : भाजप नेते चैनसुख संचेती अध्यक्ष असलेल्या मलकापूर अर्बन बॅंकेवर रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने निर्बंध घातले आहेत. पुढील सहा महिन्यांसाठी हे निर्बंध आहेत. या कालावधीत ग्राहक १० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढू शकणार नाहीत.

यापूर्वी मलकापूर अर्बन बँकेला केवायसी संदर्भात 2 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. या बॅंकेत १ हजार कोटींपेक्षा जास्त ठेवी झाल्यामुळे हे निर्बंध घालण्यात आल्याचे समजते. यासंदर्भात रिझर्व बॅंकेने बॅंकेला पत्र पाठवले आहे. ही माहिती मिळताच बॅंकेच्या बुलडाणा जिल्ह्यासह खानदेश मराठवाडा भागात प्रस्थ असलेल्या बँकेच्या ग्राहकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. मलकापूर अर्बन बँकेच्या राज्यात मुख्य कार्यालय व २८ शाखा आहेत.

मलकापूर अर्बन मध्ये १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी आहेत. खानदेश, मराठवाडा, विदर्भात मोठं प्रस्थ आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर, अकोला व वर्धा अशा मोठ्या शहरांत शाखा आहेत. बँकेचे वेअर हाऊससुद्धा आहेत. भाजपचे माजी आमदार चैनसुख संचेती या बँकेचे अध्यक्ष आहेत. यापूर्वी २००८ सालीसुद्धा बँकेच्या कारभारावर आरोप झाले होते. सध्या कामकाजात अनियमितता असल्याचा ठपका रिझर्व्ह बँकेने ठेवला आहे. बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणल्याने ग्राहकांमध्ये खळबळ उडाली असून अजून तरी बँकेकडून कुठलेही प्रसिद्धी पत्रक काढण्यात आलेले नाही. याआधी २००८ मध्ये स्थानिक ग्राहकाने रिझर्व्ह बँकेकडे तक्रार केली होती, त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे.

Malkapur Urban Bank LTD. Malkapur
नाराज चैनसुख संचेती यांनी वर्षभरानंतर घेतला पदभार

काय म्हटलंय RBIच्या पत्रात ?

24 नोव्हेंबर 2021 रोजी व्यवसायाच्या समाप्तीपासून, बँक, RBI च्या लिखित मंजुरीशिवाय किंवा कोणत्याही कर्जाचे आणि अग्रिमांचे नूतनीकरण, कोणतीही गुंतवणूक करणार नाही. निधीची उधार घेणे आणि नवीन ठेवी स्वीकारणे, वितरण किंवा कोणतीही देयके आणि दायित्वे पूर्ण करताना किंवा अन्यथा, कोणतीही तडजोड किंवा व्यवस्थेत प्रवेश करणे आणि 24 नोव्हेंबर 2021 रोजी आरबीआय निर्देशानुसार अधिसूचित केल्याशिवाय कोणतीही मालमत्ता किंवा मालमत्ता विकणे, हस्तांतरित करणे किंवा अन्यथा विल्हेवाट लावण्यास सहमत आहे. त्‍याची प्रत बँकेच्‍या आवारात इच्‍छुक सदस्‍यांनी पाहण्‍यासाठी प्रदर्शित केली आहे.

वरील RBI निर्देशांमध्ये नमूद केलेल्या अटींच्या अधीन राहून सर्व बचत बँक किंवा चालू खाती किंवा ठेवीदाराच्या इतर कोणत्याही खात्यातील एकूण शिल्लक रकमेच्या 10,000 (रुपये दहा हजार) पेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी दिली जाऊ शकते. आरबीआयच्या वरील निर्देशांचा मुद्दा म्हणजे आरबीआयने बँकिंग परवाना रद्द केला असे समजू नये. बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय सुरू ठेवेल. रिझर्व्ह बँक परिस्थितीनुसार या निर्देशांमध्ये बदल करण्याचा विचार करू शकते. हे निर्देश 24 नोव्हेंबर 2021 रोजी व्यवसाय बंद झाल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लागू राहतील आणि ते पुनरावलोकनाच्या अधीन आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com