रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित

सोयाबीन आणि कापसाला रास्त भाव मिळावा,सोयाबीनवरील जीएसटी रद्द व्हावा, आदी मागण्यांसाठी रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी गेल्या चार दिवसांपासून सुरू केले होते.
रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित
Ravikant Tupkar

बुलढाणा : बुलढाण्याचे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी आंदोलन स्थगित केले आहे. राज्याचे अन्न व औषध मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी तुपकरांची भेट घेत आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. या विनंतीनंतर शिंगणे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन आंदोलन स्थगित केले. आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालायात दाखल करण्यात आले आहेे.

सोयाबीन आणि कापसाला रास्त भाव मिळावा,सोयाबीनवरील जीएसटी रद्द व्हावा, आदी मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी गेल्या चार दिवसांपासून सुरू केले होते. यावर, सरकार तात्काळ आपल्या सोयाबीन कापूस उत्पादक संदर्भात ज्या काही मागण्या आहेत त्याविषयी तातडीने मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्यासोबत बैठक बोलावली आहे व लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या मंजूर कश्या होतील, या पद्धतीने निर्णय घेणार असल्याचे शिंगणे यांनी सांगितले.

Ravikant Tupkar
रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला हिंसक वळण ; तहसीलदारांची गाडी पेटवली

दरम्यान तुपकरांची प्रकृती खालावल्याने या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास बुलढाणा तहसील कार्यालयात उभी असलेली तहसीलदारांची जीप जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

तर स्वाभिमानीचे पादाधिकारी शेख रफीक यांनी अंगावर डिझेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी चिखली रोडवर रास्ता रोको केला. याठिकाणी रविकांत तुपकर स्वतः रस्त्यावर उतरल्याने कार्यकर्ते अजून संतप्त झाले होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in