Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांच्या आंदोलनाचा वनवा राज्यभर पेटणार...

यापूर्वी रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी २० ऑक्टोबर रोजी चिंचपूर, भोरटेक, शेलापूर बुद्रूक, माकोडी, जहागीरपूर, शेलगाव बाजार, सावरगाव, निपाणा, माळेगाव, आव्हा, उऱ्हा, दहिगाव, लिहा, तळणी, शेलापूर खुर्द आदी गावांमध्ये बैठका, सभा घेतल्या आहेत.
Ravikant Tupkar
Ravikant TupkarSarkarnama

नागपूर : सोयाबीन - कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा येत्या रविवारी निघणारा मोर्चा हा तमाम शेतकरी, शेतमजुरांच्या रोषाचे प्रतीक ठरणार आहे. या मोर्चातूनच राज्यभर (Maharashtra) आंदोलनाचा वणवा पेटणार आहे. यापुढे सोयाबीन-कापूस आंदोलनाचे प्रमुख केंद्र म्हणून बुलढाण्याची नोंद घेतली जाईल. त्यामुळे या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी आणि आपल्या हक्काच्या लढाईसाठी एल्गार मोर्चात सहभागी व्हा, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे.

बुलढाणा (Buldana) जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात एल्गार मोर्चाची जोरदार तयारी सुरू आहे. शेतकरी, शेतमजूर स्वयंस्फूर्तीने मोर्चात सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत. यापूर्वी रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी २० ऑक्टोबर रोजी चिंचपूर, भोरटेक, शेलापूर बुद्रूक, माकोडी, जहागीरपूर, शेलगाव बाजार, सावरगाव, निपाणा, माळेगाव, आव्हा, उऱ्हा, दहिगाव, लिहा, तळणी, शेलापूर खुर्द आदी गावांमध्ये बैठका, सभा घेतल्या आहेत. तर १ नोव्हेबर रोजी तालुक्यातील खडकी, खामखेड, राहेरा, दाभा, नाईकनगर, नळकुंड, उबाळखेड, तपोवन, पोखरी, किन्होळा, खांडवा, बाम्हंदा, पान्हेरा, राजूर या गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी (Farmers) संवाद साधला.

गावोगावी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून एल्गार मोर्चासाठी शेतकरी, शेतमजूर सज्ज झाले आहेत. सत्ताधारी, विरोधक तसेच शासन व प्रशासन अशा सर्वांनीच शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांबाबत बोलायला सध्या कुणीच पुढे येत नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांनाच आपल्या हक्काची लढाई लढावी लागणार आहे. भीक मागण्यासाठी नव्हे तर आपला हक्क मागण्यासाठी आपण मोर्चा काढत आहोत. शेतकऱ्यांचा हा एल्गार मोर्चा सरकारला हादरा बसविणारा ठरणार आहे. ६ नोव्हेंबर रोजी बुलढाण्यातून सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या लढाईचा एल्गार होणार असून या मोर्चानंतर राज्यभर आंदोलन पेटणार आहे, असे तुपकर यांनी सांगितले.

Ravikant Tupkar
रविकांत तुपकर म्हणाले, त्यांनी भाव मिळवून घेतला; आता आपली ताकद दाखवण्याची वेळ...

सोयाबीन - कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून दिल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही, असे रविकांत तुपकर यांनी सांगितले आहे. मोताळा तालुक्यात या मोर्चाची जोरदार तयारी केली जात असून गावागावांतून शेतकऱ्यांचे जत्थे बुलढाण्यात दाखल होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. या दौऱ्यात ह.भ.प. वासुदेवशास्त्री महाराज, प्रदीप शेळके, मारोती मेढे, महेंद्र जाधव, सैय्यद वसीम, दत्ता पाटील, भागवत धोरण, उमेश राजपूत, रशीद पटेल, निखिल शिंबरे, विजय बोराडे, पवन भारसाखळे, अमीर शेख, वासुदेव मेढे, शुभम मेढे, सतीश नवले, निलेश पुरभे, संजय तायडे, संदीप गोरे सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in