Ravikant Tupkar News : व्यापाऱ्यांनी थकवले शेतकऱ्यांचे पैसे; तुपकर पुन्हा उतरले रस्त्यावर, म्हणाले...

Farmers : अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांची भेट घेतली.
Ravikant Tupkar with Farmers
Ravikant Tupkar with FarmersSarkarnama

चिखली तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांचे पैसे थकविणारे व्यापारी गाडे बंधूंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. आज रविकांत तुपकरांनी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांची भेट घेतली.

चिखली पोलीस स्टेशन येथे गाडे बंधूंविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. त्यांना तातडीने अटक करून कडक कारवाई करू, असा शब्द जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांनी तुपकरांना दिला. त्याआधी रविकांत तुपकरांनी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत याप्रकरणी आपण शेवटपर्यंत शेतकऱ्यांसाठी जिवाची बाजी लावून लढू असा शब्द दिला.

चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला शेतमाल व्यापारी संतोष गाडे व त्यांच्या बंधूंना विकला होता. मात्र, त्यांनी आपले पैसे आरटीजीएस करतो किंवा काही दिवसांनी देतो म्हणत शेतकऱ्यांचे पैसे थकवले. यासंदर्भात शेतकरी तक्रारी करत आहेत. रविकांत तुपकर यांनी यापूर्वीच ११ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सदर व्यापाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान गेल्या तीन-चार दिवसांपासून ते शेतकऱ्यांच्या संपर्कात असून आज देखील त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. गेल्या काही वर्षांपासून काही व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे.

Ravikant Tupkar with Farmers
Ravikant Tupkar News : ...तर रविकांत तुपकर खासदार प्रतापराव जाधवांना चितपट करतील; आघाडी वज्रमुठ आवळणार?

फसवणुकीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करणे गरजेचे आहे. तसेच ज्यावेळी शेतकरी व्यापाऱ्यांना आपला माल देतो, तेव्हा व्यापाऱ्यांचा आरटीजीएस करण्याचा आग्रह असतो. त्याऐवजी रोखीने पैसे मिळण्याची व्यवस्था असावी. चिखली तालुका व परिसरातील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. त्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.

निसर्गाची मार, मग सरकारचे (Government) दुर्लक्ष आदींनी शेतकरी (Farmers) आधीच पिचलेला आहे. न्याय हक्कासाठीदेखील शेतकऱ्यांना लढाई लढावी लागते. बॅंका (Bank) विम्याचे पैसे वेळेवर देत नाही आणि आता व्यापाऱ्यांनीही शेतकऱ्यांनी लुबाडण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी शेकडो शेतकऱ्यांना सोबत घेऊन पोलीस (Police) अधीक्षक कार्यालय गाठले. तेव्हा कुठे त्या व्यापाऱ्यावर गुन्हे दाखल आले आणि अटक करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com