अमरावतीत राणा दांपत्यास धक्का; नगरसेविकेचा राष्ट्रवादीत प्रवेश

यापूर्वी युवा स्वाभिमानी पक्षाच्या तब्बल ३५ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेला आहे
Sapna Thakur joins NCP
Sapna Thakur joins NCPSarkarnama

अमरावती : आमदार रवि राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाला अमरावतीच्या (Amravati) नगरसेविका (corporator) सपना ठाकूर यांनी रामराम केला आहे. नगरसेविका ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी त्यांचे स्वागत केले. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणा यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे. (Ravi Rana's party corporator Sapna Thakur joins NCP)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. पाटील यांनी अमरावती शहर आणि ग्रामीण अशा पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेतला. त्यावेळी सपना ठाकूर यांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. प्रदेशाध्यक्षांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.

Sapna Thakur joins NCP
सासवडच्या पालखीतळावर दिलेला शब्द एकनाथ शिंदेंनी पाळला; ‘उपसा सिंचन’च्या वीजदरात कपात

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवि राणा यांच्या पक्षाला दुसऱ्यांदा धक्का बसला आहे. यापूर्वी राणा यांनी राज ठाकरे यांना भोंग्याचा मुद्यावर उघडपणे पाठिंबा दर्शविला हेाता, त्यावेळी युवा स्वाभिमानी पक्षातील तब्बल ३५ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता विद्यमान नगरसेविकेने पक्ष सोडला आहे.

Sapna Thakur joins NCP
पंढरपूरचे अभिजीत पाटील लवकरच भाजपत प्रवेश करतील : प्रवीण दरेकरांना विश्वास

या वेळी जयंत पाटील म्हणाले की, अमरावती शहरात सर्व काही असतानाही येथे राष्ट्रवादीचे नगरसेवक कमी निवडून येतात, याची मला प्रचंड खंत वाटते. मात्र शहराची सध्याची परिस्थिती पाहता पुढच्या काळात या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल असा मला विश्वास आहे. आपल्या जिल्ह्याला विचारांचा मोठा वारसा आहे, या जिल्ह्याने आपल्या विवेकाचा वापर करून अनेकदा चांगल्या लोकांना संधी दिली आहे. येणाऱ्या काळातही काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण वर आणण्याचा प्रयत्न करू.

Sapna Thakur joins NCP
Gokul Meeting : आमचे माईक बंद केले, आम्हाला बोलू दिले नाही, असे आरोप करत शौमिका महाडिकांचा सभात्याग

संजय खोडके यांनी या शहरात चांगल्याप्रकारे पक्ष बांधला आहे. लोकांसोबत संपर्क ठेवणे फार महत्त्वाचे आहे. लोकांसाठी सदैव उपलब्ध राहिले पाहिजे. संजय खोडके हे आपल्या बाईकवर फिरत असताना लोकांशी संवाद साधतात, त्यांच्या अडचणी असतील तर ते सोडवतात, असे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांच्या कामाचे कौतुक जयंतराव पाटील यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com