राणा दांपत्याचं महाराष्ट्रात होणार जंगी स्वागत! असा असेल मेगाप्लॅन

हनुमान चालिसावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राणा दांपत्यांमधील वादाने टोक गाठले होते.
Navneet Rana and Ravi Rana Marathi News
Navneet Rana and Ravi Rana Marathi NewsSarkarnama

अमरावती : हनुमान चालिसावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राणा दांपत्यांमधील वादाने टोक गाठले होते. थेट 'मातोश्री'लाच आव्हान दिल्याने राणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्यांना तुरुंगातही जावे लागले. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर नवनीत राणा संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीच्या अभ्यास दौऱ्यावर गेल्या आहेत. या दौऱ्यात रवी राणा (Ravi Rana) देखली आहेत. त्यामुळे अनेक दिवस अमरावतीपासून हे दोघेही दुरुच आहेत. त्यामुळे त्यांच्या अमरावती (Amravati) वापसीचा मेगाप्लान ठरला आहे. (Navneet Rana Latest News)

रवी राणा आणि नवनीत राणा यांचे 28 मे ला दुपारी 1 वाजता नागपूर विमानतळावर आगमन होणार आहे. येथे त्यांचे कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत होणार आहे. त्यानंतर दुपारी 1. 30 वाजता राणा दांपत्य हे नागपूर येथील रामनगर चौकातील हनुमान मंदिरात महाआरती करुन हनुमान चालीसा पठण करणार आहेत.

Navneet Rana and Ravi Rana Marathi News
'अदित्य ठाकरे पंचतारांकित हाँटेलमधील पार्ट्या सोडून प्रत्यक्ष काम कधी पाहणार?'

त्यानंतर दुपारी 2 वाजता ते अमरावतीकडे प्रयाण करणार आहेत. अमरावती जिल्यात तिवसा, मोझरी, नांदगाव पेठ याठिकाणी त्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. सायंकाळी 5 वाजता अमरावती शहरात आगमन झाल्यावर विविध चौकात त्यांचे स्वागत होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता दसरा मैदान येथील हनुमान मंदिर येथे महाआरती आणि सामुहिक हनुमान चालीसा पठण होणार.

Navneet Rana and Ravi Rana Marathi News
नाराज आमदारांचा लेटरबॉम्ब अन् मुख्यमंत्र्यांचा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दणका

दरम्यान, राणा दांपत्यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हण्याचा इशा दिल्यानंतर शिवसैनिक (ShivSena) रस्त्यावर उतरले होते. त्यातून राणा दांपत्यांना तुरुंगवारी करावी लागली, तरीही राणांचा बाणा शिवसेनेविरोधातच राहिला. या घटनेत अनेक शिवसैनिकांविरोधात गुन्हेही दाखल झाले आहेत. तरीही राणांना जशास तसा धडा शिकविण्याचा कार्यकर्त्यांचा इरादा कायम राहिला. त्यातून शिवसेना, ठाकरेंचे शक्तीप्रदर्शन झाले आणि राणा 'बॅकफूटवर गेल्याचे चित्रही निर्माण झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com