रवी राणांचा पालकमंत्री यशोमती ठाकुरांवर मोठा आरोप ; म्हणाले..

हनुमान चालिसा प्रकरणावरुन राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पेटला आहे.
रवी राणांचा पालकमंत्री यशोमती ठाकुरांवर मोठा आरोप ; म्हणाले..
Yashomati Thakur, Ravi Rana accuse Yashomati Thakursarkarnama

अमरावती :अमरावती शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अनधिकृत पुतळा हटविण्यात आल्यानंतर उफाळून आलेला वाद निवळत असतानाच आता आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या हनुमान चालिसा प्रकरणावरुन राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पेटला आहे. पालकमंत्री यशोमती ठाकुर (Yashomati Thakur) यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. (Ravi Rana accuse Yashomati Thakur)

''सध्या अमरावती जिल्ह्यातील अचलपूर परतवाडा परिसरात संचारबंदी लागू आहे.याआधी अमरावती शहरात आणि त्यानंतर अचलपूर परिसरात दंगल झाल्याने अमरावतीला गालबोट लागले आहे.राज्यासह देशभरात अमरावतीची वेगळी ओळख असताना अमरावतीचे नाव खराब होत आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन शांततेचा आव्हान केलं पाहिजे,''असं मत आमदार रवी राणा यांनी व्यक्त केलं आहे. रवी राणा यांनी याबाबतचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर शेअर केला आहे.

Yashomati Thakur, Ravi Rana accuse Yashomati Thakur
'अर्धवटराव' म्हणत धनंजय मुंडेंनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली

या व्हिडिओमध्ये रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री यशोमती ठाकुर (Yashomati Thakur)यांच्यावर टीका केली आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकुर या फेल्युअर असल्याचे मत त्यांनी व्यक्त केल आहे.अमरावतीत पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे.त्यामुळे अमरावतीत अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. अमरावतीमधील परिस्थितीत हाताळण्यास पालकमंत्री अयशस्वी ठरल्या आहेत, असे राणा म्हणाले.

Yashomati Thakur, Ravi Rana accuse Yashomati Thakur
न्यायालयाचा अवमान संजय राऊतांना भोवणार ? ; जनहित याचिका दाखल

हनुमान चालिसावरुन राणा दाम्पत्य आणि शिवसेनेत सध्या खटके उडत आहेत.राणा दाम्पत्यांने थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्याचे पडसाद नुकतेच अमरावतीत उमटले. काँग्रेस,राष्ट्रवादी आणि रिपाइंच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या खासदार नवनीत राणा यांचा हिंदूत्ववादी कल,आमदार रवी राणा यांनी भाजपला दिलेला पाठिंबा, राणा दाम्पत्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकास्त्र आणि राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे प्रसिद्धीतंत्र यातून अमरावतीचे राजकारण अलीकडच्या काळात टोकदार बनत चालल्याचे चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.