Balu Dhanorkar on RSS: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला फुले-शाहू-आंबेडकरांचा वैचारिक वारसा नष्ट करायचा आहे...

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांच्या दहा पिढ्या विकत घेवू शकतील, एवढी त्यांची ऐपत होती.
Balu Dhanorkar and Chandrakant Patil
Balu Dhanorkar and Chandrakant PatilSarkarnama

महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा सुरू केल्या, असे वक्तव्य भाजपचे नेते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी चांगलाच समाचार घेतला.

महात्मा फुले धनाढ्य होते. चंद्रकांत पाटलांच्या (Chandrakant Patil) दहा पिढ्या विकत घेवू शकतील, एवढी त्यांची ऐपत होती. फुले, आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपली संपत्ती आणि जीवन बहुजनांच्या उद्धारासाठी खर्ची घातले. मागील काही दिवसांपासून भाजपकडून (BJP) नियोजितपणे बहुजन महापुरुषांच्या चारित्र्य हननाचा प्रयत्न सुरू आहे. पाटील यांचे नवे वक्तव्य याच षड्यंत्राचा भाग असल्याचा आरोप खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी आरोप केला.

या देशातील बहुजनांच्या शिक्षणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवकांनी कधीही कधी प्रयत्न केले नाही. बहुजन महापुरुषांनीच त्यासाठी आपले जीवन आणि संपत्ती खर्ची घातली. त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन लाखो लोकांनी या महापुरुषांना मदत केली. त्यामुळे आजची पिढी शिकू शकली. चंद्रकांत पाटीलही त्या महापुरुषांमुळे शिकले, याचा विसर पाटील यांना पडल्याचं दिसतंय. पाटील यांचे वक्तव्य सहज आले नाही. हे त्यांनी जाणीवपूर्वक केले आहे. आधी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंची बदनामी आणि चारित्रहननाची मोहीम याच लोकांनी राबविली असल्याचेही खासदार धानोरकर म्हणाले.

आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी भाजप नेत्यांची बेताल वक्तव्य करण्याची स्पर्धा सुरू आहे. यामागे मोठे षड्यंत्र आहे. मात्र आमच्या आदरस्थानांविषयी कुणीही बेताल वक्तव्य करीत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही. पाटील यांनी महाराष्ट्रातील जनतेची नाक घासून माफी मागितली पाहिजे. महाराष्ट्रातील फुले- शाहू-आंबेडकरांचा वैचारिक वारसा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नष्ट करायचा आहे. पाटील त्याच शाखेतील विद्यार्थी आहे. म्हणून खोट्या इतिहासाची त्यांना माहिती आहे. यापुढेही बहुजन महापुरुषांच्या बदनामीची मोहीम या लोकांकडून आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. परंतु तो प्रयत्न आम्ही हाणून पाडू, असा इशाराही खासदार धानोरकर यांनी दिला. चंद्रकांत पाटील यांनी ही टीका करतानाच महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक क्रांतीचा पाया देशात रोवला याची कबुली दिली, असा चिमटा धानोरकर यांनी घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com