RSS office : राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुख्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी; नागपूरमध्ये खळबळ

RSS Headquarters : पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये...
RSS Headquarters
RSS HeadquartersSarkarnama

RSS Headquarters : सध्या सगळीकडे २०२२ या वर्षाला निरोप तर २०२३ या नव्या वर्षाचे स्वागत करण्यात येत आहे. असे असतानाच नागपूर येथील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुख्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याने नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

आज (३१ डिसेंबर २०२२ ) दुपारच्या सुमारास पोलिसांना नागपूर येथील राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुख्यालय उडवून देण्याची धमकी देणारा एक निनावी फोन आला. त्यामुळे पोलीस सतर्क झाले असून या प्रकणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

संघाचे मुख्यालय उडवून देण्याची धमकी देणारा एक निनावी फोन आल्यामुळे नागपूर पोलिसांनी संघ मुख्यालय परिसरात सुरक्षा वाढवली आहे. तसेच हा धमकी देणारा फोन नेमकी कुणी केला? ही धमकी कुणी दिली? याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

RSS Headquarters
Kshirsagar News : क्षीरसागर काका-पुतण्याच्या लढाईत आमदार सोळकेंची पुतण्याला खंबीर साथ!

नेमकी काय घडलं?

आज (३१ डिसेंबर २०२२ ) दुपारी १ वाजताच्या दरम्यान नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाला निनावी फोन आला. या निनावी फोनवरुन संघ मुख्यालय उडवण्याची धमकी देण्यात आली. या फोन नंतर पोलीस अॅक्शन मोडवर आले असून तातडीने राष्ट्रीय स्वंयसेवक संघ मुख्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली. तसेच पोलिसांकडून विविध ठिकाणी तपासणी करण्यात येत असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

RSS Headquarters
Pune : माधुरी मिसाळ यांची लक्षवेधी अन् फडणवीसांची मोठी घोषणा; झोपडपट्टी विकासाला मिळणार...

दरम्यान, नववर्षाच्या पूर्वसंध्येला संघ मुख्यालय उडवून देण्याच्या निनावी फोनमुळे नागपूरमध्ये (Nagpur) खळबळ उडाली आहे. तर या प्रकारमुळे पोलीस यंत्रणाही अलर्ट झाली आहे. तर संघ मुख्यालयाला मोठ्या प्रमाणात सुरक्षा देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com