माघार घेतील ते राणा कसले, संजय राऊतांच्या विरोधात नागपुरात तक्रार दाखल...

शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नागपुरात केलेल्या वक्तव्याविरोधात युवा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी नागपूर पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.
माघार घेतील ते राणा कसले, संजय राऊतांच्या विरोधात नागपुरात तक्रार दाखल...
Sanjay Raut and Rana Husband-WifeSarkarnama

नागपूर : राणा दाम्पत्याविरुद्ध शिवसेना हा संघर्ष आता आणखीनच भडकला आहे. मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते चांगलेच खवळले आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नागपुरात केलेल्या वक्तव्याविरोधात युवा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी नागपूर पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे.

खासदार नवनीत राणा (Navnit Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. एफआयआर रद्द करण्याची राणा यांची विनंती न्यायालयाने अमान्य केली. आता या प्रकरणावर २९ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान राणा दाम्पत्य सरळ सरळ आले असते तर त्यांचे मातोश्रीवर स्वागतच केले असते, पण ते दादागिरीने येऊ बघत होते. शिवसेना दादागिरी खपवून घेत नाही. दादागिरीला कसे उत्तर द्यायचे हे आम्हाला शिकवले गेले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाने राणा दाम्पत्याची बाजू उचलून धरली आहे. त्यामुळे हा संघर्ष आता थेट भाजप व शिवसेना असा झालेला आहे.

आमदार रवी राणा व खासदार नवनीत रवी राणा यांना नागपूर येथील पत्रकार परिषदेत २० फूट खड्ड्यात गाडण्याची व स्मशानात गोवऱ्या रचून ठेवण्याची भाषा करणाऱ्या शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर १५३(ए), २९४, ५०६ भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल करून तातडीने अटक करा, अशी मागणी करणारे निवेदन व लेखी तक्रार युवा स्वाभिमानी संघटनेने नागपूर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना दिले.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अटकेवरून सध्या राज्यात रणकंदन सुरू आहे. मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर शिवसेना नेतृत्वाने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नागपूरमध्ये बोलताना, मातोश्रीसमोर आंदोलन करायला आल्यास वीस फूट खड्ड्यात गाडले जाल, असे वक्तव्य केले होते.

Sanjay Raut and Rana Husband-Wife
संजय राऊत राणांचे जातप्रमाणपत्र रद्द झाल्याचा दावा करतात, ते प्रकरण नेमकं काय आहे?

या वक्तव्याची दखल घेत युवा स्वाभिमानी पक्षाने संजय राऊत यांच्याविरुद्ध नागपूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. युवा स्वाभिमानी पक्षाच्या एका शिष्टमंडळाने आज नागपूर पोलीस आयुक्त अमितेष कुमार यांची भेट घेत त्यांच्याकडे आपली तक्रार दिली आहे. तक्रारीसोबत संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेचा पेन ड्राईव्हही युवा स्वाभिमानीच्या नेत्यांनी नागपूर पोलिसांना दिला आहे.

अनुसूचित जातीच्या असणाऱ्या खासदार नवनीत रवी राणा यांना जातिवाचक शिवीगाळ व जाहीरपणे जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय राऊत यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्रॉसिटी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याचे अभिवचन दिले. यावेळी अॅड. दीप मिश्रा, जितू दुधाने, विनोद गुहे व सचिन भेंडे उपस्थित होते.

प्रक्षोभक वक्तव्य केले होते. यापुढे शिवसेनेच्या नादाला लागण्यापूर्वी आपल्या गोवऱ्या स्मशानात रचून यावे. शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका नाहीतर २० फूट खड्ड्यात गाडले जाल. तुम्ही पुन्हा अमरावतीतून लोकसभेत जाऊन दाखवा. स्वतःमध्ये लढायची ताकद नाही म्हणून अशा या शिखंडीना पुढे केले जात असल्याचे संजय राऊत म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.