Rana : सणाचा आनंद आणि कामसुद्धा; राणा दाम्पत्याचा मेळघाटात मुक्काम !

Employment Guarantee Scheme : या होळीला रोजगार हमी योजनेचे पैसे रखडल्याने आदिवासी चिंतित होते.
Ravi and Navnit Rana
Ravi and Navnit RanaSarkarnama

The Rana couple entered the Melghat on the occasion of Holi : आदिवासी बांधवांचा सर्वांत मोठा सण असलेल्या होळीच्या निमित्ताने त्यांच्यातच राहून त्याचा आनंद द्विगुणित करण्याची परंपरा खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी यावर्षीही कायम राखली आहे. होळीच्या निमित्ताने ते मेळघाटात दाखल झाले आहेत.

पुढील चार दिवस त्यांचा मुक्काम मेळघाटातच राहणार आहे. लोकप्रतिनिधी मेळघाटात येऊन बघतच नाहीत. ही ओरड गेल्या कित्येक वर्षांपासून होती. पण राणा दाम्पत्य नियमितपणे मेळघाटच्या दौऱ्यावर असतात. विशेष म्हणजे होळी आणि दिवाळी हे सण ते आदिवासी बांधवांसोबतच साजरा करतात. या होळीला रोजगार हमी योजनेचे पैसे रखडल्याने आदिवासी चिंतित होते.

खासदार नवनीत राणा यांनी तत्काळ जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्यासोबत संपर्क साधून यावर तोडगा काढण्याचे सुचविले, जिल्हाधिकाऱ्यांनीही या संदर्भात तत्काळ कार्यवाही करण्याचे वचन दिल्याने आता आदिवासींना तातडीने मजुरीचे पैसे मिळणार आहेत. त्यांची होळी आता आनंदात जाणार आहे. परंपरा, संस्कृती जोपासून गेल्या १२ वर्षांपासून आपली होळी आदिवासी बंधू-भगिनीसोबत साजरी करणारे आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांचा मेळघाट होलीमिलन स्नेहमीलन दौरा सुरू झाला आहे.

अमरावती (Amravati) जिल्ह्यातील मेळघाटात (Melghat) कालपासूनच होळीची धूम सुरू झाली असून येथील आदिवासी बांधव होळी एक वेगळ्या पद्धतीने साजरी करतात. हा उत्सव निसर्गाला प्रमाण मानून साजरा केला जातो. सलग दोन दिवस होळी पेटविली जाते, तर त्यानंतर सलग पाच दिवस रंगपंचमी खेळली जाते. आदिवासी बांधव रंगपंचमीला पंचमी असे संबोधतात. पहिल्या दिवशी लहान होळी व दुसऱ्या दिवशी मोठी होळी पेटविली जाते.

Ravi and Navnit Rana
Navnit Rana : नवनीत राणा को गुस्सा क्यू आया? पोलिसांवर भडकल्या खासदार राणा !

दोन्ही होळीची आदिवासी बांधव मोठ्या आस्थेने पूजा करतात. ही होळी पेटविण्याचा मान गावातील पाटलाला असतो. आदिवासी बांधव ढोलकी व बासरी वाजवीत होळीच्या आसपास नाच करून होलिका मातेला प्रसन्न करतात व त्यानंतर संपूर्ण गावकरी होळी मातेचे पूजन करतात. पूजन झाल्यानंतर संपूर्ण गावकरी होळीच्या अवतीभवती फिरून गाणे व नाच केला जातो.

निसर्गपूजक आदिवासी बांधव..

मेळघाटातील आदिवासी बांधव हे निसर्गपूजक आहेत. रंग खेळताना पळस फुल व इतर निसर्गापासून तयार केलेले रंग रंगपंचमी खेळताना वापरतात. येणारे वर्ष सुख, समृद्धी, आनंद आणि उत्साहात जावो, अशी प्रार्थना ते करतात. त्यांच्या या आनंदात आमदार रवी राणा (Ravi Rana) व खासदार नवनीत राणा (Navnit Rana) दरवर्षी सहभागी होतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com