Ramtek Lok Sabha News : आघाडीत जागेवरून मतभेद होण्याची शक्यता, तुमानेंचे काय; कमळ की धनुष्यबाण?

Nana Patole : नाना पटोले यावेळी नागपूर लोकसभा लढण्याच्या मुडमध्ये नाहीत.
Krupal Tumane
Krupal TumaneSarkarnama

Ramek Lok Sabha constituencies MP Krupal Tumane News : नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी यांच्या विरोधात महाविकास आघाडीतून कोण लढणार, हे अद्याप निश्‍चित नाही. गेल्या वेळी लढलेले नाना पटोले यावेळी नागपूर लोकसभा लढण्याच्या मुडमध्ये नाहीत, असं दिसतंय. तिकडे रामटेकसाठी आघाडीत मतभेद होण्याची शक्यता दिसते आहे. अशा वेळी खासदार कृपाल तुमाने कमळावर लढणार की धनुष्यबाण कायम ठेवणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. (For Ramtek, there seems to be a possibility of differences in the alliance)

शिंदे सेनेसोबतची युती आणि शिवसेनेसोबत फारकत झाल्याने रामटेक लोकसभा मतदारसंघात भाजप कोणावर डाव लावणार, हेसुद्धा पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत या जागेवर टोकाचे मतभेद होण्याची शक्यता दिसते. शिवसेनेचे कृपाल तुमाने रामटेक मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहे. भाजप-शिवसेना युतीचा त्यांना चांगलाच फायदा दोन्ही निवडणुकांत झाला. आता मात्र ते शिंदे सेनेत दाखल झाले आहेत.

अलीकडे ते जिल्ह्यातील सर्वच कार्यक्रमांमध्ये चांगलेच सक्रिय झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फिरतानाही आढळले. साहजिक शिंदे सेना आपल्या खासदाराला वाऱ्यावर सोडणार नाही. त्यामुळे रामटेकमध्ये तिसरी इनिंग तुमाने यांना खेळण्यास मिळण्याची शक्यता आहे. आजवर युती असल्याने भाजपने या मतदारसंघात एके काळी पाच आमदार असतानाही लोकसभेच्या जागेवर दावा केला नाही. त्यामुळे लोकसभा लढणारा ताकदवर उमेदवार येथे भाजपकडे नाही.

तुमाने यांना डावलल्यास नाराजीचा फटका भाजपलाही बसू शकतो. भाजपचा सर्व कल शिंदे यांना सांभाळून ठेवण्याचा दिसत आहे. त्यांच्या जागांना धक्का लावायचा नाही, असे एकंदरीत चित्र दिसते. फक्त तुमाने आता कमळ हाती घेतात की धनुष्यबाण कायम ठेवतात, हेच पाहणे महत्वाचे आहे.

Krupal Tumane
Ramtek Lok Sabha : तुमानेंची वाट खडतर; आघाडीची ताकद अन् मतदारसंघाचा इतिहासही ठाकरेंच्या पथ्यावर पडणार...?

या मतदारसंघात चार वेळा शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे तुमाने गेले तरी सहजासहजी ही जागा उद्धव ठाकरे यांची सेना सोडेल असे दिसत नाही. दुसरीकडे मुकुल वासनिक पराभूत झाल्यानंतर काँग्रेसनेही या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले. मागील निवडणुकीत सेवानिवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना दोन दिवस आधी रामटेकमध्ये पाठवले होते. मात्र त्यांच्या उमेदवारीस काँग्रेस नेत्यांनीच विरोध दर्शवला होता.

माजी मंत्री व उत्तर नागपूरचे (Nagpur) आमदार नितीन राऊत यांनी राहुल गांधी यांनी आपणास उमेदवारी दिल्याचे जाहीर केले होते. माजी मंत्री व सावनेरचे आमदार सुनील केदार यांच्या उपस्थितीत त्यांनी उमेदवारी दाखल केली होती. ती नंतर मागे घेतली. कॉंग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आल्याने तुमाने यांचे तेव्हा चांगलेच फावले होते.

Krupal Tumane
Nagpur Metro : मेट्रो स्टेशनसाठी खर्च झाले ४१ कोटी, पण पार्किंगसाठीचा खर्च बघाल, तर बसेल धक्का !

नागपूरचे प्रकल्प तुमानेंच्या खात्यात..

बुटीबोरी आणि हिंगणा एमआयडी रामटेक (Ramtek) लोकसभा मतदारसंघात येतात. शहरात जागा नसल्याने नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे सर्वच मोठे प्रकल्प रामटेक लोकसभेत साकारले जातात. त्यामुळे ही सर्व कामे आपसूक तुमाने यांच्या खात्यात जमा होत आहेत. याचाही त्यांना मोठा फायदा होणार आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com