Ramtek APMC Result News : नेता विरुद्ध कार्यकर्ता संघर्षात कार्यकर्ता जिंकला, आमदार केदारांना रामटेकमध्ये धक्का !

Sunil Kedar : केदार यांना त्यांचेच कट्टर समर्थक सचिन किरपान यांनी आव्हान दिले होते.
Sunil Kedar and Sachin Kirpan
Sunil Kedar and Sachin KirpanSarkarnama

ललित कनोजे

Nagpur District's Ramtek APMC Result News : रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक निकालाकडे नागपूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. कारण या निवडणुकीत वर्षानुवर्षे नागपूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या राजकारणावर दबदबा ठेऊन असलेले कॉंग्रेसचे नेते, माजी मंत्री व सावनेरचे आमदार सुनील केदार यांना त्यांचेच कट्टर समर्थक सचिन किरपान यांनी आव्हान दिले होते. (Kedar was challenged by his staunch supporter Sachin Kirpan.)

पण या निवडणुकीत नेता विरुद्ध कार्यकर्ता या सामन्यात नेत्याला पराभवाची चव चाखावी लागली. या निवडणुकीत आमदार सुनील केदार यांनी आपली वज्रमूठ सैल करीत शिवसेना (एकनाथ शिंदे गटाचे) रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांच्याशी युती केली. सहकार पॅनल व भाजपचे माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी शेतकरी विकास पॅनल तर सचिन किरपान यांनी शेतकरी सहकार पॅनल मैदानात उतरविले होते.

आजी माजी आमदार व दिग्गजांसमोर कार्यकर्त्यांचे पॅनल निवडून येणे आश्र्चर्यचकीत करणारे ठरले. जिल्ह्यातील राजकारणाला वेगळेच वळण लागल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम जिल्ह्यातील अंतर्गत राजकारणावर आणि पुढील निवडणुकांवर होणार का, याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.

या निवडणुकीत आमदार सुनील केदार, आमदार आशिष जयस्वाल, जि.प. सदस्य दुधराम सव्वालाखे तर भाजपचे माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, कॉंग्रेसचे उदयसिंह ऊर्फ गज्जू यादव, प्रहारचे जिल्हाप्रमुख रमेश कारामोरे, गोडवाना पार्टीचे जि.प. सदस्य हरिष ऊईके व सचिन किरपान, मिन्नू गुप्ता, जि.प. सदस्या शांता कुंभरे, त्रिलोक मेहर हे त्यांच्या दिमतीला होते.पण १८ पैकी १४ जागांवर सचिन किरपान शेतकरी सहकार पॅनलने विजयी मिळवत कृषी उत्पन्न समितीवर कब्जा केला.

Sunil Kedar and Sachin Kirpan
Telhara APMC Election Result : तेल्हाऱ्यात वंचित आणि शिवसेनेने (ठाकरे गट) दिली भाजपला मात !

भाजप प्रणीत शेतकरी विकास पॅनलने ४ जागा जिंकल्या. मात्र सुनील केदार गटाच्या सहकार पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही. सहकार क्षेत्रात त्यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. २९ एप्रिलला सकाळी साडेनऊ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली, तेव्हापासून सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घनश्यामराव किंमतकर सभागृहाकडे गर्दी केली होती. सर्वप्रथम ग्रामपंचायत मतदार संघाची मतमोजणी झाली.

ग्रामपंचायत गटात भाजपप्रणीत शेतकरी (Farmer) विकास पॅनलचे रणवीर यादव, उमेश भांडारकर, बादु वरखडे, योगेश म्हात्रे यांनी विजय मिळविला. तर सेवा सहकारी मतदार संघात थेट लढत आमदार सुनील केदार (Sunil Kedar)आमदार आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांच्याविरुद्ध केदार यांचे निष्ठावान कार्यकर्ते राहिलेले सचिन किरपान यांच्या शेतकरी सहकार पॅनल यांच्यात झाली. यामध्ये नेता (Leader) विरुद्ध कार्यकर्ता अशा लढतीमध्ये कार्यकर्त्यांनी नेत्याला चीत केले आणि १८ पैकी १४ जागांवर वर्चस्व मिळवले.

Sunil Kedar and Sachin Kirpan
Patan APMC Result : पाटणला पालकमंत्र्याच्या पॅनेलची आघाडी; व्यापारीत राष्ट्रवादी पुढे...

सेवा सहकारी मतदार संघातून सर्व ११ जागांवर विजय मिळविला. त्यामध्ये सचिन किरपान, विरेश आष्टनकर, त्रिलोकचंद मेहर, रामू झाडे, नरेश मोहने, यशवंत भलावी, झनकलाल मरस्कोल्हे, नीळकंठ महाजन, नकुल बरबटे, लक्ष्मी कुमरे, साबेरा पठाण, व्यापारी अडते संघामध्ये भिमराव आंबिलढुके, विजय मदनकर, हमाली मापाडी मधून शंकर तांबूलकर यांनी विजयी झाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com