रामदास आठवले म्हणाले, नाना पटोले डॅशींग; दिली ‘ही’ ऑफर...

रामदास आठवले (Ramdas Athavale) म्हणाले, महाविकास आघाडीतील शिवसेना किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आमच्याकडे आल्याशिवाय ते सरकार पडू शकत नाही. दुसरं म्हणजे कॉंग्रेसने पाठिंबा काढला तरच सरकार पडेल.
रामदास आठवले म्हणाले, नाना पटोले डॅशींग; दिली ‘ही’ ऑफर...
Ramdas Athavale and Nana patole, Ramdas Athavale offers to Nana patole, Ramdas Athavale News UpdatesSarkarnama

भंडारा : गेल्या अडीच वर्षांपासून भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी सर्व स्तरांवर जोर लावत आहे. पण त्यात त्यांना अद्याप यश आलेले नाही. याबाबत काल गोंदिया येथे एका कार्यक्रमासाठी आलेले रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना विचारले असता, त्यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना खुली ऑफर देऊन टाकली. (Ramdas Athavale offers to Nana patole)

रामदास आठवले (Rameas Athavale) म्हणाले, महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) शिवसेना किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आमच्याकडे आल्याशिवाय ते सरकार पडू शकत नाही. दुसरं म्हणजे कॉंग्रेसने पाठिंबा काढला तरच सरकार पडेल आणि सध्याची स्थिती पाहता कॉंग्रेस पाठिंबा काढण्याची शक्यता आहे. कारण त्यांचे मंत्री आमदारांमध्ये नाराजीचा सूर ऐकायला मिळतो आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) डॅशींग नेते आहेत. पण कॉंग्रेसला या सरकारमध्ये पाहिजे तसे महत्व मिळत नाहीये. त्यामुळे त्यांनी आमच्या सोबत यावे, अशी मी त्यांना ऑफर देतो.

नाना पटोलेंनी सोनिया गांधींना सांगावे आणि या सरकारचा पाठिंबा काढावा, असे आवाहन मी पटोलेंना करतो. त्यांचा आमच्याकडे पूर्ण सन्मान केला जाईल. तसेही सध्या ते महाविकास आघाडीमध्ये अन्याय सहन करीत आहेत. इतर दोन पक्षांतील नेत्यांसोबत दररोज काही ना काही धुसफुस सुरू असते. त्यामुळे राज्यातील विकास कामांवरसुद्धा त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे कॉंग्रेसने तेथे घुसमट सहन केल्यापेक्षा महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावे आणि आमच्यासोबत यावे, असे रामदास आठवले म्हणाले.

Ramdas Athavale and Nana patole, Ramdas Athavale offers to Nana patole, Ramdas Athavale News Updates
Video: राज ठाकरेंनी मंदिरांवर भोंगे लावावे, पण; रामदास आठवले

हिंसा कराल, तर जेलमध्ये जाल..

हिंसा करणे चुकीचे आहे, हिंसा कराल तर जेलमध्ये जावे लागेल, असा इशारा ही दिल्ली येथील दंगलखोरांना रामदास आठवले यांनी दिला आहे. हिंसा करणाऱ्यांवर केंद्र सरकारने व राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी दिल्ली येथे झालेल्या घटनेबाबत केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.