स्वतंत्र विदर्भ चळवळीचे बिनीचे शिलेदार राम नेवले यांचे निधन
Ram Newale Sarkarnama

स्वतंत्र विदर्भ चळवळीचे बिनीचे शिलेदार राम नेवले यांचे निधन

१९८४ मध्ये ते शेतकरी संघटनेच्या Farmer Association संपर्कात आले. नागपूर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी Ram Newale कारकीर्द सुरू केली.

नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समिती व नुकत्याच स्थापन केलेल्या जय विदर्भ पार्टीचे संस्थापक, शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष राम नेवले यांचे मंगळवारी १६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री हृदयविकाराने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने वेगळ्या विदर्भ चळवळीचे बिनीचे शिलेदार गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

८ ऑक्टोबर १९५१ मध्ये नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या पत्नीचे चार वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक विवाहित मुलगी असा आप्त परिवार आहे. मानेवाडा घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी कृषी, सामाजिक यांसह इतर क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ते मूळचे नागपूर जिल्ह्यातील नरखेडचे होते.

नरखेड येथे त्यांचे कृषी सेवा केंद्र होते. १९८४ मध्ये ते शेतकरी संघटनेच्या संपर्कात आले. नागपूर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. सुरुवातीला शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेचे बिनीचे शिलेदार असलेले नेवले कालांतराने संघटनेतून बाहेर पडले. नंतरचे सर्व आयुष्य त्यांनी वेगळ्या विदर्भासाठी झोकून दिले. वेगळ्या विदर्भासाठी त्यांनी शेवटपर्यंत लढा दिला.

Ram Newale
‘जय विदर्भ’च्या माध्यमातून राम नेवले राजकीय आयुधांनी मिळविणार स्वतंत्र राज्य...

नुकतीच त्यांनी महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी जय विदर्भ पार्टीची स्थापना केली होती. ‘तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजे,’ यासाठी शेतकरी संघटनेचे नेते व कार्यकर्त्यांनी सरकारने लावलेली बंदी झुगारून एचटीबीटी बियाण्याची लागवड केली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in