Rajura APMC Result : राजुऱ्यात ‘त्रिमूर्ती’ने केला शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त !

Congress-BJP : १८ पैकी १४ जागांवर काँग्रेस-भाजप युतीने स्पष्ट बहुमत मिळवले.
Rajura APMC
Rajura APMCSarkarnama

Chandrapur Distict's Rajura APMC Election Result : राजुरा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस-भाजप युतीने दणदणीत विजय मिळवाल. आज (ता. २९ एप्रिल) रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पार पडलेल्या मतमोजणीत १८ पैकी १४ जागांवर काँग्रेस भाजप युतीने स्पष्ट बहुमत मिळवत शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. (The stronghold of the farmers' organization was destroyed)

तब्बल वीस वर्षानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँग्रेस-भाजप युतीला दणदणीत विजय मिळवता आला. एकूण १८ जागांपैकी काँग्रेस-भाजप युतीने १४ जागा प्राप्त केल्या. एक अपक्ष, तर शेतकरी संघटनेला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. पहिल्यांदाच आमदार सुभाष धोटे, माजी आमदार ॲड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी एकत्र येऊन शेतकरी संघटनेचा गेम केला.

आज शेतकरी संघटनेचे तब्बल वीस वर्षापासून बाजार समितीवर असलेले वर्चस्व संपुष्टात आले आहे. शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात एक हाती सत्ता होती. मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीतील सत्ता उद्ध्वस्त करण्यासाठी आजी व माजी आमदारांनी युती करून शेतकरी संघटनेचा विधानसभेतील राजकारणाचा सफाया केला. काँग्रेस-भाजप युतीने राजुरा विधानसभा क्षेत्रात शेतकरी संघटनेच्या ताब्यात असलेल्या एकमेव कृषी उत्पन्न बाजार समितीवरील वर्चस्व संपुष्टात आणले.

राजकारणातील प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांना पाहण्यात पाहणारे काँग्रेस आणि भाजप युतीच्या रणनीतीने येणाऱ्या स्थानिक निवडणुकांत मतदारांसमोर एक नवीन पर्याय समोर आणला आहे. आजच्या निकालामुळे शेतकरी संघटनेला जबरदस्त फटका बसला. तर काँग्रेसने भाजपने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

Rajura APMC
Ramtek APMC Election Results : केदार-जयस्वाल युतीचा सुपडा साफ; जुन्या कार्यकर्त्यांनीच दिला झटका !

सेवा सहकारी मतदार संघातून सात पैकी सहा उमेदवार काँग्रेस-भाजप युतीचे विजयी झाले. यात ॲड. अरुण धोटे, उमाकांत धांडे, विनोद झाडे, सतीश कोमरवेलीवार, संजय पावडे, आशिष नलगे, तर शेतकरी संघटना समर्थीत पॅनलचे प्रफुल्ल कावळे विजयी झाले. सेवा सहकारी संस्था (महिला) गटातून काँग्रेस-भाजप युतीचे दोन्ही उमेदवार विजयी झाले. यात सरिता रेड्डी आणि विठाबाई झाडे यांचा समावेश आहे.

सेवा सहकारी संस्था मतदार संघ (इतर मागासवर्गीय) गटातून शेतकरी संघटनेचे प्रभाकर ढवस विजयी झाले. सेवा सहकारी संस्था मतदार संघ (विमुक्त जाती/ भटक्या जमाती गट) यामधून काँग्रेस भाजप युतीचे तिरुपती इंदूरवार विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत गटातून (सर्वसाधारण गटामध्ये )काँग्रेस-भाजप युतीचे दोन्ही उमेदवार विजयी झाले. यात जगदीश्वर बुटले व राकेश हिंगाने यांचा समावेश आहे.

Rajura APMC
Sakoli APMC Result : पटोलेंच्या मतदारसंघात डाॅ. फुकेंनी राष्ट्रवादीच्या साथीने काॅंग्रेसला दिला धक्का!

ग्रामपंचायत मतदार संघ (अनुसूचित जाती /जमाती ) मतदारसंघातून शेतकरी (Farmers) संघटनेचे दिलीप देठे, ग्रामपंचायत मतदार संघ (आर्थिक दुर्बल घटकातून) (Congress) काँग्रेस-भाजप (BJP) युतीचे विकास देवाडकर हे अविरोध निवडून आले. अडते व व्यापारी मतदार संघातून अपक्ष उमेदवार गोपाळ झंवर, तर काँग्रेस भाजप युतीचे नवनाथ पिंगे ईश्वर चिठ्ठीने विजयी झाले. हमाल व मापारी मतदारसंघातून काँग्रेस भाजप युतीचे लहू बोंडे हेसुद्धा ईश्वरचिट्टीने विजयी झाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in