आमदारांनी आधी केली चूक नंतर ढसाढसा रडले

हिंगोलीच्या वसमत शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) घोड्यावर चढून नवघरे यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
आमदारांनी आधी केली चूक नंतर ढसाढसा रडले
NCP MLA Raju Navghare Sarkarnama

हिंगोली: हिंगोलीचे (Hingoli) राष्ट्रवादीचे (NCP) आमदार राजू नवघरे (Raju Navghare) यांचा एक व्हिडीओ चांगलाचा व्हायरल झाला आहे, या व्हिडीओमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. हिंगोलीच्या वसमत शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) घोड्यावर चढून नवघरे यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. मात्र आपली चूक लक्षात येताच त्यांनी माफीही मागितली. माफी मागताना त्यांना अश्रू अनावर झाले. या घटनेचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नवघरे यांच्या या गंभीर चुकीवर सर्वत्र टीका होत आहे.

NCP MLA Raju Navghare
चित्रा वाघ भडकल्या : महिला आयोगावर शूर्पणखा नको

याबाबत आमदार नवघरे यांनी स्पष्टीकरणही दिले. “महाराजांचा पुतळा उंच असल्याने मी त्यावर चढू शकत नव्हतो. मात्र कार्यकर्ते आणि इतर पक्षाच्या कार्यत्यांनी मला घोड्यावर चढवलं. माझ्यासह तिथे उपस्थित असणाऱ्या अनेकांनी वर चढून महाराजांना पुष्पहार चढवला. पण फक्त माझाच व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. या कार्यक्रमाच्या वेळी शिवसेनेचे माजी आमदार डॉ जयप्रकाश मुंदडा आणि इतर नेतेही वर चढले होते. मी महाराजांच्या विचारांचा कार्यकर्ता आहे. शहरात महाराजांचा उभारण्यासाठी मी भरपूर प्रयत्न केले. महाराजांचे जंगी स्वागत व्हावे म्हणून पोलिसांची परवानगी नसतांनाही आम्ही नोटीसा स्वीकारून महाराजांच्या स्वागतासाठी बँड लावला. पण माझ्यासारख्या सामान्य माणसाला राजकीय षडयंत्रातून बदनाम केलं जात असल्याचे, असं आमदार नवघरे यांनी म्हंटल आहे.

तसेच, “मी अठरा पगड जातीला मानणारा, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा कार्यकर्ता आहे. मी येथे होतो तेव्हा माजी आमदार मुंदडा साहेब हे देखील तिथे होते. त्यांनीच मला घोड्यावर वर चढवलं. तुम्ही पहिल्यांदा हार घाला म्हणाले, त्यानंतर डॉ. जयप्रकाश मुंदडाही वर चढले. पण मला एकट्याला बदनाम केलं जात आहे. माझ्या चूकीसाठी मी जाहीर माफी मागतो. पण मला बदनाम करु नका. तुम्हाला वाटत असेल तर मी पुन्हा सार्वजनिक कार्यक्रमातही दाखल होणार नाही”, असं बोलत असताना आमदार राजू नवघरे ढसाढसा रडू लागले.

Related Stories

No stories found.