Teachers Constituency Election : शिक्षक भारतीकडून राजेंद्र झाडे, राजकीय पक्ष अजूनही विचारात !

Rajendra Zade : शिक्षक भारती संघटनेकडून राजेंद्र झाडे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
Nagpur Teachers Constituency Election
Nagpur Teachers Constituency ElectionSarkarnama

Nagpur Teachers Constituency Election : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ३० जानेवारीला होऊ घातली आहे. त्यासाठी उद्या ५ जानेवारीपासून अर्ज दाखल करता येणार आहेत. पण अद्याप एकाही पक्षाकडून उमेदवार ठरलेला नाही. प्रत्येक जण एक दुसऱ्याची वाट बघत आहे. एकही उमेदवार ठरलेला नसल्याने निवडणुकीचे वातावरण अद्याप तयार झालेले नाही.

शिक्षक भारती संघटनेकडून राजेंद्र झाडे यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यांनी कॉंग्रेसला (Congress) मदत मागितली आहे. त्यासाठी त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची भेट घेतली. पण अद्याप त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी (NCP) कॉंग्रेसने भूमिका स्पष्ट केली नाही. दुसरीकडे भाजपचा (BJP) उमेदवार ठरला तर नाहीच, पण उमेदवार ठरवण्याच्या दृष्टीने बैठकाही झालेल्या नाहीत.

भाजपकडून इच्छुक असलेलेही संभ्रमात पडले आहेत. परवा परवा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सेवा सदन येथे कार्यक्रम झाला. त्यात या मतदारसंघाचे १२ वर्ष प्रतिनिधित्व केले नागो गाणार उपस्थित होते. त्यावरून भाजपचा पाठिंबा नागो गाणार यांनाच राहील, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. शेवटी नितीन गडकरी (Nitin Gadkari) ठरवतील तोच उमेदवार असेल, अशीही चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलेले आहे.

पदवीधर निवडणुकीमध्ये भाजपचा गड कॉंग्रेसने नेस्तनाबूद केला होता. भाजपकडून मैदानात उतरलेले उमेदवार संदीप जोशी यांना मोठा पराभव पत्करावा लागला होता. त्या निवडणुकीत कॉंग्रेसचे अभिजित वंजारी मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. संदीप जोशी आणि भाजपसाठी तो मोठा धक्का होता. पदवीधरचा अनुभव लक्षात घेता भाजपला शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत जोखीम घ्यायची नाही. त्यामुळे एकवेळ इच्छुकांना बाजूला ठेवले जाईल. पण विजयाची खात्री असलेला उमेदवारच देण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपकडून याही वेळी उमेदवारी नागो गाणार यांनाच देण्याची शक्यता जास्त आहे.

Nagpur Teachers Constituency Election
शिक्षक मतदारसंघ निवडणूक : शिक्षक भारतीने नाना पटोलेंना करून दिली ‘ती’ आठवण !

१२ जानेवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. १३ ला अर्जांची छाननी होणार असून १६ जानेवारी ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. १२ जानेवारीपर्यंत कुणाचे अर्ज येतात, याची वाट बघितली जात आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षाच्या बी फॉर्मची गरज नसते. त्यामुळे प्रक्रिया फार क्लिष्ट नाही. भाजपकडून माजी महापौर डॉ. कल्पना पांडे, डॉ. संजय भेंडे, योगेश बन आणि प्रदीप बिबटे हे इच्छुक आहेत. पक्षाच्या भूमिकेकडे त्यांचे लक्ष लागलेले आहे. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिक्षक आघाडीकडून गंगाधर नाकाडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पण ती पक्षाची अधिकृत घोषणा नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com