भाजपच्या बावनकुळेंना टक्कर देण्यासाठी कॉंग्रेसकडून राजेंद्र मुळक?

कॉंग्रेसकडून राजेंद्र मुळक Rajendra Mulak from congress यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. पण अद्याप घोषणा झालेली नाही. त्यामुळे सध्याच या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार नाही.
Chandrashekhar Bawankule and Rajendra Mulak
Chandrashekhar Bawankule and Rajendra MulakSarkarnama

नागपूर : विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून राज्याचे माजी ऊर्जामंत्री व प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर यांचे नाव निश्‍चित करण्यात आले. अद्याप कॉंग्रेसने आपल्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॉंग्रसचे नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांचे नाव जवळपास निश्‍चित झाले आहे.

आज दुपारपर्यंत मुळक यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विधानपरिषदेचे विद्यमान सदस्य गिरीष व्यास यांचा कार्यकाळ संपत आला आहे. येत्या १० डिसेंबरला मतदान होणार आहे. १४ डिसेंबरला मतमोजणी होईल. १६ ते २३ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरायचा आहे आणि २६ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.

भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांना मैदानात उतरवल्यामुळे त्यांच्यावर २०१९ मध्ये झालेला अन्याय धुवून निघणार आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यानंतरही बावनकुळे थांबले नाहीत. तर पक्षाच्या प्रत्येक कामात व्यस्त राहिले. या काळात अनेक आंदोलनांचे नेतृत्व त्यांनी केले आणि श्रेष्ठींच्या विश्‍वासावर खरे उतरले. त्यांनी पक्षाप्रती निष्ठा बघून श्रेष्ठींना उमेदवारी द्यावी लागली. तिकडे कोराडीला कालपासून बावनकुळेंच्या चाहत्यांनी गर्दी करणे सुरू केले. साहेब पुन्हा आमदार होणार, हा आनंद साजरा करण्यात कार्यकर्ते दंग झाले आहेत.

Chandrashekhar Bawankule and Rajendra Mulak
विधान परिषद : भाजपकडून बावनकुळे, महाडिक; पण चित्रा वाघांना संधी नाही

निवडणुकीचा विचार करता भाजपकडे बळ अधिक आहे. या निवडणुकी ५६२ मतदार मदतान करणार आहेत. यात महानगरपालिकेचे १५६, जिल्हा परिषदेचे ५८ आणि नगरपंचायतीचे ३ सदस्य सहभागी होणार आहेत. महानगरपालिके १५६ पैकी १०५ सदस्य भाजपचे आहेत. जिल्हा परिषेच्या सदस्यांची बेरीज केल्यावर भाजपकडे ६४ मते जास्त आहेत. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळेंना ही निवडणूक सोपी असल्याचे दिसतेय.

कॉंग्रेसकडून राजेंद्र मुळक यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. पण अद्याप घोषणा झालेली नाही. त्यामुळे सध्याच या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार नाही. कॉंग्रेसमध्ये ऐन वेळेवर काहीही होऊ शकते. शेवटच्या २ मिनीटांत उमेदवार बदलल्या गेल्याचेही जनतेने बघितले आहे. त्यामुळे कॉंग्रेसचा उमेदवार घोषीत होण्याची प्रतिक्षा केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com