Raj Thackeray : राज ठाकरे तब्बल ५ दिवस विदर्भात तळ ठोकणार...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray) हे तब्बल पाच दिवस विदर्भात राहणार आहेत. आज सकाळी ते नागपुरात (Nagpur) दाखल झाले.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray) हे तब्बल पाच दिवस विदर्भात राहणार आहेत. आज सकाळी ते नागपुरात (Nagpur) दाखल झाले. नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती महानगरपालिकांच्या निवडणुकांसंदर्भात ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहे. मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी आज त्यांच्या दौऱ्याची माहिती दिली.

आगामी महानगरपालिका (Municipal Corporation) निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. पक्ष संघटन वाढविणे, हादेखील या दौऱ्यामागील उद्देश आहे. या दौऱ्यात ते नागपूर, चंद्रपूर व अमरावती येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी महानगर पालिका निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करून मार्गदर्शन करणार आहेत. नागपुरात आज त्यांचा मुक्काम असेल. उद्या दुपारी २ वाजता ते चंद्रपूरकडे प्रयाण करतील. तेथे उद्या त्यांचा मुक्काम असेल. तेथून मंगळवारी दुपारी ते अमरावतीकडे प्रयाण करतील. तेथे अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत.

राज ठाकरे यांच्या दौऱ्याची तयारी करण्यासाठी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, अविनाश जाधव, आनंद एम्बडवार, मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर हे गेल्या तीन दिवसांपासून नागपुरात तळ ठोकून आहेत. नागपूरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे फारसे अस्तित्व नाही. सेनेचे दोन आणि राष्ट्रवादीचा एकच नगरसेवक आहे. त्यामुळे काँग्रेस दीडशे पैकी पन्नास जागाही सोडायला तयार नाही. त्यांची ताकद वाढवून आपल्या पायावर धोंडा मारून घ्यायचा नाही, असे येथील स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत मनसे नागपुरात पूर्ण ताकद लावणार असल्याचेही राजू उंबरकर यांनी सांगितले.

Raj Thackeray
Raj Thackeray : राज ठाकरे यांचे नागपुरात जल्लोषात स्वागत, मिशन विदर्भ सुरू…

नागपुरात पुन्हा उघडणार खाते?

कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेची ताकद वाढणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. शिवसेनेच्या मतांमध्ये विभाजन व्हावे, याकरिता भाजपचीही गुप्त तयारी सुरू आहे. ज्या भागांत शिवसेनेचे प्राबल्य आहे, अशा भागांत मनसेचे उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दोनचार टक्के मतांचे विभाजन झाले तरी भाजप-मनसे युतीचा उद्देश साध्य होणार आहे. नवे राजकीय समीकरण तयार झाल्यास नागपूर महापालिकेत मनसेचे खाते पुन्हा उघडू शकते. याचा फायदा मनसेला चंद्रपूर आणि अमरावती महानगरपालिकांमध्येही होऊ शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in