Raj Thackeray : राज ठाकरे तब्बल ९ वर्षांनंतर चंद्रपुरात; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह...

काल चंद्रपूरला येण्यापूर्वी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वरोरा येथे रमेश राजूरकर यांच्या घरी भेट दिली. रमेश राजूरकर यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama

चंद्रपूर : राज ठाकरे तब्बल ९ वर्षांनंतर काल चंद्रपुरात (Chandrapur) दाखल झाले. यापूर्वी २०१३ मध्ये ते आले होते. नागपूर ते चंद्रपूर मार्गावर खांबाडा, वरोरा, पडोली आणि चंद्रपुरमध्ये मनसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. आज येथे सकाळी ९.३० वाजतापासून ते कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील कार्यकर्ते ९ वर्षांनंतर आपल्या नेत्याला बघून उत्साहित झाले आहे. काल सायंकाळी येथील विश्रामगृहावर त्यांचे स्वागत करण्यात आले.

विश्रामगृहाचा परिसर कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेला होता. ‘आमचे साहेब आले, आमचे दैवत आले’, असे फलक जागोजागी लागलेले आहेत. आज कार्यकर्ते राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) भेटीसाठी उत्सुक आहेत. मनसेच्या सर्व सेलमधील पदाधिकारी व कार्यकर्ते बैठकीसाठी जेथे ठाकरेंचा मुक्काम आहे, त्या हॉटेल एन.डी. कडे मार्गस्थ झाले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांचा हा उत्साह आगामी निवडणुकांमध्ये दिसणार असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर (Raju Umbarkar) यांनी ‘सरकारनाम’ला सांगितले.

काल चंद्रपूरला येण्यापूर्वी राज ठाकरे यांनी वरोरा येथे रमेश राजूरकर यांच्या घरी भेट दिली. रमेश राजूरकर यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी ते तिसऱ्या क्रमांकावर होते. आता यावळी ते मनसेकडून लढण्याची शक्यता कार्यकर्त्यांनी वर्तविली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून आमदार देण्याची तयारी येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. आजच्या बैठकांनंतर कार्यकारिणीमध्येही बदल केले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray Autograph ...अन् अखेर राज ठाकरे त्या चिमुकल्याला भेटले

राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. काल नागपूर शहर आणि जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या त्यांनी बैठका घेतला. महापालिका निवडणुकीचा आढावासुद्धा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी कार्यकारिणी बरखास्त करण्याची घोषणा केली. घटस्थापनेनंतर नव्या कर्यकारिणीची घोषणा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. या मागचे कारण विचारले असताना विदर्भात अनेक होतकरू व युवा कार्यकर्ते आहेत, त्यांना संधी देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकारिणी बरखास्त केली असली तरी नव्या कार्यकारिणीत नव्या व जुन्यांचा समावेश केला जाईल, असे सांगून त्यांनी दिलासाही दिला. आज चंद्रपुरात कार्यकर्त्यांना ते काय संदेश देतील, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in