Vidarbha Politics| राज ठाकरेंचा मोठा निर्णय: विदर्भातील जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदल

Raj Thackeray| Vidarbha Politics| आगामी काळात विदर्भातील सर्व निवडणूका मनसे लढणार आहे.
Raj Thackeray| Vidarbha Politics|
Raj Thackeray| Vidarbha Politics|

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे तब्बल पाच दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मनसेने विदर्भातील जबाबदाऱ्या बदलल्या असून मोठे फेरबदल केले आहेत.

आगामी काळात विदर्भातील सर्व निवडणूका मनसे लढणार आहे. त्यासाठी हेमंत गडकरी आणि इतर पदाधिकाऱ्यांकडून विदर्भातील पक्षाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी आता अनिल शिदोरी, प्रकाश महाजन, राजू उंबरकर, अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांच्याकडे विदर्भाची जबाबदारी दिली आहे. पुढील काळात हेच पदाधिकारी विदर्भातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका, मेळावे आणि शिबिरे घेणार असल्याची माहिती आहे. राज ठाकरे यांनी स्वत: फेसबुक पोस्टच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.

Raj Thackeray| Vidarbha Politics|
Eknath Shinde यांचा भाजपलाच धक्का: १०० पदाधिकारी शिंदे गटाच्या गळाला

रविवारी (१८ सप्टेंबर) राज ठाकरे यांनी नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. दोघांनीही नागपुरात फुटाळा तलावात म्युझिकल फाऊंटेन शो पाहिला. या भेटीनंतर आता आज (१९ सप्टेंबर) राज ठाकरे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी जाऊन राज ठाकरे त्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. ही सदिच्छा भेट असल्याचे बोलले जात असले तरी महापालिका निवडणूकांच्या दृष्टीने या भेटीत निश्चितच राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून मनसे भाजप युतीची चर्चा आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. काही आठवड्यांपूर्वी राज ठाकरे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाली होती. मुंबईतील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही भेट घेतली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in