Rahul Narvekar : मोठी बातमी! सहा महिन्याच्या आत विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांवर विरोधकांचा अविश्वास ठराव

Rahul Narvekar News : महाविकास आघाडीकडून राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव
Rahul Narvekar at Nagpur
Rahul Narvekar at NagpurSarkarnama

Rahul Narvekar News : सध्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून हे अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजत आहे. असे असतानाच आज महाविकास आघाडीचे नेते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.

राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्याच्या आतच त्यांच्यावर अविश्वासाचा प्रस्ताव दाखल झाला आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष झाले. मात्र आता त्यांच्यावर अविश्वासाचा प्रस्ताव दाखल झाल्यामुळे त्यांची अडचण होण्याची शक्यता आहे.

Rahul Narvekar at Nagpur
Dipali Sayyad : दिपाली सय्यद दोन महिन्यांपासून वेटिंगवर; शिंदे गटातला प्रवेश कुठे अडला?

याबाबत ३९ आमदारांचं पत्र महाविकास आघाडीकडून विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांना देण्यात आलं. आमदारांना अधिवेशनामध्ये बोलू न दिल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे. काँग्रेसचे नेते सुनील केदार, शिवसेनेचे नेते सुनील प्रभू, सुरेश वरपुडकर, अनिल पाटील यांनी हे पत्र सचिवांना दिलं आहे.

दरम्यान, या प्रस्तावाबाबत पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. तर हे हिवाळी अधिवेशन सुरुवातीपासूनच वादळी ठरलं. या अधिवेशनामध्ये कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद तसेच शिंदे गटातील मंत्र्यावरील झालेले आरोप तसेच आदित्य ठाकरे यांच्यावर झालेले आरोप अशा अनेक मुद्यांनी हे अधिवेशन गाजलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com