राहुल गांधींच्या यात्रेबाबत मोठी बातमी, राज्यातील १६ किमीचा टप्पा चार चाकीतून पार करणार; कारण...

Bharat Jodo Yatra News : काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची 'भारत जोडो' पदयात्रा १६ नोव्हेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातून अकोला जिल्ह्यात दाखल होणार आहेत.
Rahul Gandhi
Rahul Gandhisarkarnama

Bharat Jodo Yatra News : काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची 'भारत जोडो' पदयात्रा १६ नोव्हेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातून अकोला जिल्ह्यात दाखल होणार आहेत. मात्र, राहुल गांधी वाशिममधून अकोला जिल्ह्यात प्रवेश करताना मेडशी ते पातुरदरम्यानचा १६ किलोमीटरचा प्रवास चारचाकी वाहनाने करणार आहेत.

त्याचे कारणही समोर आले आहे. मेडशी ते पातूरदरम्यान जंगलाचा परिसर आहे. तसेच हा रस्ताही लहान आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीवे सुरक्षा यंत्रणांनी त्यांना गाडीतून प्रवास करण्याची विनंती केली. राहुल गांधीं यांना सीआरपीएफची झेड प्लस सुरक्षा आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीआरपीएफने हा १६ किमीचा प्रवास चारचाकी वाहनाने करण्याची विनंती केली होती. ती विनंती राहुल गांधी यांनी मान्य केल्याची माहीत आहे.

Rahul Gandhi
भाजपने डाव साधला; अरविंद केजरीवालांना दिल्लीतच गुंतवून ठेवले

भारत जोडो यात्रा १६ नोव्हेंबर रोजी अकोला जिल्ह्यात दाखल होणार आहे. मात्र, ही यात्रा तब्बल १६ किमी'चा प्रवास गाडीने करणार आहे. कारण, वाशिम जिल्ह्यातील मेडशी ते अकोला जिल्हापर्यंतचा मार्ग हा जंगलाचा आहे. वन विभागाच्या क्षेत्रात येणाऱ्या मार्गावरील 'भारत जोडो' यात्रेतील प्रवास राहुल गांधी चारचाकी वाहनाने करणार आहेत. नियमभंग होऊ नये म्हणून ही दक्षता घेतली जात असल्याचे सांगितले जात आहे.

मेडशी ते पातूरपर्यंतच्या वन विभागाच्या क्षेत्रातून राहुल गांधी हे वाहनाने प्रवास करून १६ नोव्हेंबरला सायंकाळी अकोला जिल्ह्यातील पातूर इथे दाखल होणार आहेत. या यात्रेचा अकोला जिल्ह्यातून तब्बल ४५ कि. मी. चा प्रवास आहे. यात्रेदरम्यान, गांधी यांच्याशी संवाद साधण्यासाठी विद्यार्थी, कामगारांसह अनेक संघटनांचे प्रस्ताव आले आहेत. अशी माहिती काँग्रेसच्यावतीने देण्यात आली आहे.

Rahul Gandhi
उद्धव ठाकरेंनी चंगच बांधला; गोडसे, भुसे, कांदेंच्या मतदारसंघातील रणनिती ठरली

नांदेड इथे या यात्रेचा पहिला टप्पा आहे. नांदेड मार्गे हिंगोली, वाशिम, मार्गे अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील पातुर इथे सकाळी सहा वाजता राहुल गांधी यांच्यासह देशभरातील काँग्रेसचे आजी माजी नेते, पदाधिकारी कार्यकर्ते व सदस्य दाखल होणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com