Bharat Jodo Yatra : कपाळी बुक्का अन्‌ हाती वीणा देत शेगावमध्ये राहुल गांधींचे स्वागत!

भारत जोडो यात्रेचे संत नगरीच्या सीमेवर आगमन होताच खासदार राहुल गांधी यांना वारकरी संप्रदायाचे दर्शन घडणार घडले.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama

शेगाव जि. (बुलडाणा) : विठ्ठल माझा..माझा..मी विठ्ठलाचा या अभंगाच्या गजरात आणि टाळ मृदंगाच्या निनादात काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे शेगावमध्ये स्वागत करण्यात आले. एक हजार वारकऱ्यांच्या संप्रदायिक स्वागताने शेगाव तालुक्यातील वरखेड फाट्यावर आज (ता. १८ नोव्हेंबर) विठ्ठल नामाची शाळा भरली. (Rahul Gandhi was overwhelmed by welcome of the Varakaris..!)

भारत जोडो यात्रेचे (Bharat Jodo Yatra) संत नगरी शेगाव तालुक्यात आगमन झाले. श्री संत गजानन महाराज यांच्या पावनभूमित काँगेसचे खासदार राहुल गांधी यांचे सकाळी आगमन झाले. संतनगरीच्या सीमेवर वरखेड फाट्यावर त्यांचे स्वागत झाले. या वेळी डोळ्यांचे पारणे फेडणारा तसंच वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासणारा वारकरी रिंगण सोहळा पार पडला.

Rahul Gandhi
राष्ट्रवादीच्या नेत्यावर मेहेरबानी दाखवणे भोवले : दौंडच्या पोलिस निरीक्षकाची तडकाफडकी बदली

भारत जोडो यात्रेचे संत नगरीच्या सीमेवर आगमन होताच खासदार राहुल गांधी यांना वारकरी संप्रदायाचे दर्शन घडणार घडले. एक हजार वारकरी आणि विद्यार्थ्यांनी रिंगण सोहळ्यात पाऊली खेळत टाळ मृद्रुंगाच्या गजरात व अभंगाच्या जयघोष करत राहुल गांधी यांचे आगळे वेगळे स्वागत केले.

Rahul Gandhi
धनंजय मुंडेंना मोठा दिलासा : पंकजांना पुन्हा देणार आव्हान

या वेळी काँग्रेस नेते ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी टोपी व दुपट्टा देऊन खासदार राहुल गांधी यांचे स्वागत केले. या प्रसंगी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, आमदार राजेश एकडे, काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान यांच्यासह काँग्रेसचे राज्य व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. खासदार राहुल गांधी सुद्धा या सोहळ्यात सहभागी झाले. वरखेड फाट्यावर हा रिंगण सोहळा आकर्षण होता.

Rahul Gandhi
राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे भाजपच्या संपर्कात?; मौनामुळे संभ्रम वाढला

वारकरी संप्रदायाची महती देश आणि जगभर पोहोचावी, या उद्देशाने भारत जोडो यात्रेनिमित्त संत नगरी शेगाव येथे वरखेड फाट्यावर एक हजार वारकऱ्यांचा रिंगण सोहळा पार पडला. या वेळी वारकरी अभंग व टाळ मृदंगाच्या गजरात राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात आले, असे खामगावचे काँग्रेस नेते ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी सांगितले.

शेगावात मुक्काम

भारत जोडो यात्रा शेगावात आज मुक्कामी आहे. राहुल गांधी यांची निवास व्यवस्था (स्व.) गजानन दादा पाटील मार्केट यार्ड मैदानावर राहणार आहे. भारत जोडो यात्री कंटेनरमध्ये निवास करतात, त्यासाठी या मैदानावर व्यवस्था करण्यात आलेली आहे. उद्या सकाळी सहा वाजता ही यात्रा गौलखेड भेंडवळ जलंब मार्गे मार्गस्थ होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in