Rahul Gandhi : भारत जोडो यात्रा रोखूनच दाखवा : राहुल गांधीचं खुलं आव्हान!

Rahul Gandhi : भाजपच्या द्वेषपूर्ण, हिंसात्मक एकीकडे विचार आहे. तर आमचं प्रेमाचं, बंधुभावाचा विचार आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama

अकोला : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज विदर्भातील तिसरा दिवस, तर महाराष्ट्रातील यात्रेचा 11 वा दिवस आहे. आज ही यात्रा अकोला जिल्ह्यात असून सकाळी सहा वाजता पातूर येथून या यात्रेला सुरुवात झाली आहे. बाळापूर तालुक्यातील बाग फाटा इथे आज यात्रेचा मुक्काम असणार आहे. भारत जोडो यात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषात आणि आनंदात स्वागत केले जात आहे. आज एक वाजता राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली.

Rahul Gandhi
Bharat Jodo Yatra : मुख्यमंत्रीजी राहुल गांधींची यात्रा थांबवा ; शिंदे गटातील खासदाराची मागणी!

राहुल गांधी म्हणाले, मागील आठ वर्षापासून देशात दहशतीचं वातावरण आहे. ही लढाई दोन विचारांची आहे. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस कमकुवत नाही. सत्ताधाऱ्यांकडून न्यायव्यवस्थेवर दबाव आणला जात आहे. युवकांना विश्वास नाही की, त्यांना रोजगार मिळेल. डिग्री आहे पण नोकरी नाही. लोकांच्या मनामध्ये भिती निर्माण केली जात आहे. शेतकरी संकटात आहे. शेतमालाला भाव मिळत नाही. महाराष्ट्रात शाळा बंद केले जाते आहेत, त्यामुळे आम्ही लोकांचे प्रश्न मांडत आहोत, लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी भारत जोडो यात्रे शिवाय पर्याय नाही.

Rahul Gandhi
Supriya Sule on Devendra Fadnavis : 'बदल्याची भाषा मी पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या राजकारणात ऐकली'

सावरकरांनी इंग्रजांनी सावरकरांना लिहलेलं पत्र त्यांनी यावेळी वाचून दाखवलं. यात्रा रोखायची असेल तर रोखा, प्रयत्न करा. तुम्हाला यात्रेत काही चुकीचं वाटत असेल, जरूर रोखा, असे आव्हान राहुल गांधी यांनी दिले. आम्हाला भारताला जोडायचं आहे. ही यात्रा म्हणजे एक विचार आहे. एक काम करण्याची पद्धत आहे. भाजपच्या द्वेषपूर्ण, हिंसात्मक एकीकडे विचार आहे. तर आमचं प्रेमाचं, बंधुभावाचा विचार आहे. ही दोन विचारांची लढाई आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com