Rahul Gandhi News : राहुल गांधींनी मोठ्या मनाने ओबीसी समाजाची माफी मागावी !

Nagpur : एखाद्या समाजाला चोर म्हणणे चांगली गोष्ट नाही.
Ashish Deshmukh and Rahul Gandhi
Ashish Deshmukh and Rahul GandhiSarkarnama

Ashish Deshmukh on Rahul Gandhi : राहुल गांधींनी संपूर्ण देशातील ओबीसी समाजाची माफी मागावी. येत्या निवडणुकीत काँग्रेसला त्रास होण्यापासून वाचवण्यासाठी आणि ओबीसी व्होट बँकेला भाजपकडे जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी माफी मागावी, असे कॉंग्रेस नेते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले. (Calling a society a thief is not a good thing)

२०१९ मध्ये त्यांच्या तोंडून चुकून काही शब्द निघाले असतील आणि त्यामुळे मोठा ओबीसी समाज नाराज असेल तर त्यांनी नक्कीच माफी मागावी, ही आमची मागणी आहे. एखाद्या समाजाला चोर म्हणणे चांगली गोष्ट नाही. याआधीही त्यांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये माफी मागितली आहे. पण इथे ओबीसी समाजाचा मुद्दा आहे. राहुल गांधींनी माफी मागितली तर त्यांची प्रतिमा अधिक उजळून निघेल.

हा जो सगळा प्रकार सुरू आहे, तो शांत व्हायला काँग्रेसला मदत होईल. माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे इतर काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. परंतु, हा भावनांचा प्रश्न आहे. इथे फक्त एक व्यक्ती दु:खी होत नाही, तर संपूर्ण ओबीसी समाजाला दुःख होत आहे. राहुल गांधींनी मोठ्या मनाने माफी मागावी, ही आमच्यासारख्या नेत्यांची मागणी आहे. ‘चौकीदार चोर है’ च्या संदर्भातही आमच्या वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेस वर्किंग कमिटी (CWC) मध्ये नाराजी व्यक्त केली होती.

राहुल गांधींना न्यायालयात माफी मागावी लागली होती. पण तोपर्यंत २०१९ मध्ये काँग्रेसला फटका बसून चुकला होता. काही दिवसांत कर्नाटकात आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये निवडणुका आहेत, जिथे ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. येत्या २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. या सर्व निवडणुकांत काँग्रेसने ओबीसी समाजाला आपलेसे करून घेण्याची गरज आहे.

Ashish Deshmukh and Rahul Gandhi
Ashish Deshmukh : नागपूर दक्षिण-पश्‍चिमचा २०२४मध्ये कसबा होईल !

माझे वडील रणजित देशमुख हे दोन वेळा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि मंत्री राहिलेले आहेत. मी आमदार राहून चुकलो आहे. मी काँग्रेसच्या तिकिटावर देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूकही लढवली आहे. मला आशा आहे की, माझ्या या विधानाने काँग्रेस पक्षाचे हायकमांड नाराज होणार नाहीत.

ओबीसी समाजाने नाराज होऊ नये, हे महत्त्वाचे आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मी निवडणुकीत त्यांच्या विरोधात उभा राहिलो. त्यावेळी मला प्रचारासाठी फक्त ११ दिवस मिळाले. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर आपला ओबीसी समाज काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिला.

ओबीसी समाजाने काँग्रेसशी जुळलेले राहावे, हीच आमची इच्छा आहे. निवडणूक प्रचारादरम्यान चुकून काही शब्द निघाले असतील, काही जुमले निघाले असतील, तर ते परत घेऊन त्याबद्दल खेद व्यक्त करण्यात आणि त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात शंका किंवा कुशंकांना स्थान नसावे. राहुल गांधी हे मोठ्या मनाचे, चांगले हेतू असलेले व्यक्ती आहेत. त्यांनी ओबीसी समाजाला खुल्या मनाने आपलेसे करावे.

Ashish Deshmukh and Rahul Gandhi
Ashish Deshmukh : सोनियांनी अंतरात्म्याचा आवाज ऐकला होता, आता तुम्हीही ऐका !

ओबीसी (OBC) समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर नक्कीच माफी मागून त्यांची समजूत काढण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांना काँग्रेससोबत ठेवावे. आमचे प्रदेशाध्यक्षही ओबीसी समाजाचे असून ते विदर्भातील आहेत. तेदेखील निश्चितपणे याच भावनेशी जुळलेले असतील.

आमचे काँग्रेस नेते, कार्यकर्ते आणि ओबीसी समाजाच्या भावना काँग्रेस पक्षाच्या हायकमांडपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असा आमचा प्रयत्न आहे. राहुल गांधींसारख्या (Rahul Gandhi) सकारात्मक व्यक्तीने लवकरात लवकर माफी मागून पुन्हा एकदा ओबीसी समाजाला जवळ करण्यात यश मिळवावे, अशी अपेक्षा आहे. माफी मागून हा विषय इथेच संपवायला हवा, असे डॉ. आशिष देशमुख (Dr. Ashish Deshmukh) म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com