Rahul Gandhi News : राहुल गांधी आणि प्रियंका गांधींची नागपूरमध्ये होणार सभा; काँग्रेस फुंकणार रणशिंग

Nana Patole News : केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाविरोधात महाविकास आघाडीची दुसरी सभा १६ एप्रिलला नागपूरमध्ये होणार आहे.
Priyanka Gandhi, Rahul Gandhi News
Priyanka Gandhi, Rahul Gandhi NewsSarkarnama

Rahul Gandhi News : केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाविरोधात महाविकास आघाडीची दुसरी सभा १६ एप्रिलला नागपूरमध्ये होणार आहे. त्याची जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी यांची जाहीर सभाही याच महिन्यात नागपूरमध्ये होणार आहे.

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांची सभा नागपूरमध्ये होणार, असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली. राहुल आणि प्रियंका यांची एकत्र सभा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरमध्ये यापूर्वी झालेली नाही. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस अधिक आक्रमक झाली आहे.

Priyanka Gandhi, Rahul Gandhi News
Shirur News : उद्धव ठाकरे गटाला मोठे खिंडार, राष्ट्रवादीलाही दणका; अडीचशे कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश!

कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहिर झाल्या आहेत. तेथे १३ एप्रिलला राहुल गांधींची सभा होणार आहे. तर नागपुरात येत्या २० ते २५ एप्रिलदरम्यान सभेचे नियोजन करण्याचा विचार असल्याचे पटोले यांनी सांगितले. १० एप्रिलला प्रदेश कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्यात बैठकीत सभेचे ठिकाणावर चर्चा केली जाणार आहे.

Priyanka Gandhi, Rahul Gandhi News
Karnataka Election : शिरहट्टी मतदारसंघात जिंकलेला पक्ष कर्नाटकात सरकार बनवतो; यंदा वातावरण काय?

मात्र, आमचा प्रयत्न आहे की राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची सभा नागपूरमध्ये घेण्यात यावी. महाविकास आघाडीची सभा १६ तारखेला होणार आहे. त्यानंतर काँग्रेसची सभा होणार असल्याचे सांगितले जात आहे. सभेचे ठिकाण आणि तारीख काँग्रेसच्या बैठकीत ठरणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com