Pusad APMC Result News : ८१व्या वर्षीही माजी मंत्री मनोहर नाईकांचा करिष्मा कायम !

Nilay Naik : आमदार निलय नाईक यांनी भाजप-शिवसेनेची जोरदार आघाडी उभारली.
Manoharrao Naik
Manoharrao NaikSarkarnama

Yavatmal District's Pusad APMC Election Result News : पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मनोहरराव नाईक यांच्या पॅनलने सर्व अठरा जागा जिंकल्या. यावेळी प्रथमच त्यांच्या विरोधात पुतणे आमदार निलय नाईक यांनी बाजार समिती निवडणुकीत भाजप-शिवसेनेची जोरदार आघाडी उभारली. परंतु लोकांच्या मनावर कायम गारुड असणारे मनोहरराव नाईक यांचा करिष्मा अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले. (It was clear that the impact of Manohar Rao Naik is still intact)

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे विधान परिषद सदस्य आमदार निलय नाईक यांनी माजी मंत्री मनोहर नाईक यांचे पुत्र इंद्रनील नाईक यांच्या विरोधात रान उठविले होते. भाजप सत्तेत असल्याने नाईक बंगल्याचे वर्चस्व संपविण्यासाठी राजकारण तापविण्यात आले. आमदार इंद्रनील नाईक राजकारणात नवखे होते. परंतु ज्येष्ठ नेते मनोहरराव नाईक यांच्यावरील प्रेमाने ही काट्याची निवडणूक त्यांनी सहजतेने जिंकली.

सहकार क्षेत्रावर आतापर्यंत मनोहरराव नाईक यांचेच वर्चस्व आहे. यावेळी भाजप शिवसेनेने बाजार समिती निवडणुकीत स्वतंत्र पॅनल देऊन निकराचा प्रचार केला. परंतु त्यांची डाळ शिजू शकली नाही. या निवडणुकीत सर्वच जागी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलची सरशी झाली असली तरी भाजपचे आमदार निलय नाईक यांच्या नेतृत्वात निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. माळपठारावर भाजपच्या काही उमेदवारांनी थोडी आघाडी घेत विजयी उमेदवारांची दमछाक केली.

ही निवडणूक एकतर्फी झाली असे म्हणता येणार नाही. कारण निलय नाईक यांच्या पॅनलने चांगली लढत दिली. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक दक्ष राहावे लागणार आहे. तसेच ही निवडणूक आगामी विधानसभेच्या निवडणुकीची नांदी म्हणावी लागेल.

Manoharrao Naik
Ramtek APMC : रामटेकमध्ये पराभवानंतरही राहणार केदारांचेच वर्चस्व?

या निवडणुकीत विरोधकांनी बाजार समितीतील आतापर्यंतच्या संचालक मंडळाच्या कार्यशैलीवर जोरदार टीका केली. इतर बाजार समिती प्रगतिपथावर असताना पुसद बाजार समितीत मात्र शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. शेतकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, शौचालय, स्वस्त जेवणाची व्यवस्था या भौतिक सुविधा तर नाहीत. शिवाय शेतकऱ्यांचा माल ठेवण्यासाठी शेडची कमतरता आहे.मुख्य म्हणजे या बाजार समिती मोजकेच व्यापारी खरेदीसाठी उतरत असल्याने कुठलीही स्पर्धा नाही.

शेतमालाची हर्राशी, तोलाई मापाई वेळेत होत नाही. तसेच विक्रीनंतर पैसेही लगेच मिळत नाही. त्यामुळे पुसद (Pusad) क्षेत्रातील शेतमाल (Washim) वाशीम, कारंजा, आर्णी यांसारख्या बाजार समित्यांमध्ये शेतकरी घेऊन जातात. ही स्थिती सावरण्यासाठी संचालक मंडळ कमी पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड नाराजी आहे. ती निवडणुकीत (APMC Election) 'कॅश' करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. त्यात त्यांना काही प्रमाणात यश मिळाले. मात्र मनोहरराव नाईक यांची जादू अधिक प्रभावी ठरली, असेच म्हणावे लागेल.

Manoharrao Naik
Sakoli APMC Result : पटोलेंच्या मतदारसंघात डाॅ. फुकेंनी राष्ट्रवादीच्या साथीने काॅंग्रेसला दिला धक्का!

नवीन संचालक मंडळ सत्तारूढ झाल्यानंतर जुन्या दोषांचे परिमार्जन करणे, शेतकऱ्यांना (Farmers) सोयी सुविधा देणे, त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देणे, शेतकरी हा विकासाचा केंद्रबिंदू समजून उपाययोजना करणे, या गोष्टींकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अन्यथा ही जादू फार काळ टिकणार नाही, हे नक्की.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com