Modi : पंतप्रधान मोदी नागपुरात करणार समृद्धी आणि मेट्रोचे लोकार्पण, फडणवीसांनी घेतला आढावा...

Devendra Fadanvis : पंतप्रधानांच्या दौऱ्याची तारीख निश्चित होताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

Nagpur-Mumbai Samriddhi Highway : मुंबई समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्यातील महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या ११ डिसेंबर रोजी होणार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याची तारीख निश्चित होताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यामुळे प्रशासन सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नागपुरात दाखल झाले आणि महामार्गाची पाहणी करून आढावा घेतला आहे.

बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी मार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर निघाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी नागपुरात (Nagpur) उद्घाटन होणार आहे. याचवेळी नागपूर मेट्रोच्या (Metro) रिच-२ (कामठी मार्ग) व रिच-४ (सेंट्रल एव्हेन्यू) या मार्गांचेदेखील उद्घाटन होणार आहे. या लोकार्पण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज पाहणी केली. त्यापूर्वी नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, ११ डिसेंबरला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होत आहे. ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.

Narendra Modi
कोश्यारींचा करेक्ट कार्यक्रम होणार? फडणवीस म्हणतात, उदयनराजेंच्या भावना योग्य ठिकाणी पोहचल्या

नागपूर-शिर्डी हा ५०० किमी मार्ग पूर्ण झाला असून त्याच लोकार्पण होतयं. उर्वरित मार्गाचं कामही सहा महिन्यांत पूर्ण होईल. यातून आपण एक नवीन इकॉनॉमिक डोअर तयार करत आहोत, १४ जिल्हे इंटेग्रेड करण्याचं आणि पोर्टशी जोडण्याचं काम या माध्यमातून होतंय, असं फडणवीस यांनी सांगितलं. हा महामार्ग विदर्भ, मराठवाडासह एकुणच महाराष्ट्राच्या विकासात समृद्धी आणेल, अशी भावना फडणवीस यांनी व्यक्त केली. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या इतर प्रश्नांवर त्यांनी बोलणं टाळलं. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या नागपूर येथे येऊन समृद्धी महामार्गाच्या लोकापर्णाच्या कार्यक्रमाचा आढावा घेणार असल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com