Amol Mitkari News : अकोला लोकसभा लढण्याची आमदार मिटकरींची तयारी!

Akola Politics : ''भाजपला चोपायची ही संधी मला सोडायची नाही...''
Amol Mitkari
Amol Mitkari Sarkarnama

NCP Mla Amol Mitkari Tweet Viral : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी होळीच्या मुहूर्तावर ट्विट करून लोकसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. पक्षाने संधी दिल्यास भाजपाविरोधात अकोला मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे मिटकरी यांनी जाहीर केले आहे.

अमोल मिटकरी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक आक्रमक नेते आहे. ते शिंदे फडणवीस सरकारवर विविध मुद्द्यांवरुन सातत्याने हल्लाबोल करत असतात. तसेच केंद्रातील मोदी सरकारवरही ते सडकून टीका करणार्या नेत्यांपैकी मिटकरी हे एक प्रमुख नेते आहेत. आता मिटकरी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी केलेलं टि्वट राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे. मिटकरी(Amol Mitkari) यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत.

Amol Mitkari
Narendra Modi News : नगरच्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींना भेट म्हणून पाठवले कांदे; सोबतच केली 'ही' मागणी

मिटकरींच्या टि्वटमध्ये नेमकं काय?

'' माझ्या पक्षाने संधी दिल्यास भाजप (BJP) विरुद्ध अकोला लोकसभा मतदारसंघ मी लढवणार ! सध्या अकोला जिल्हा भ्रष्टाचार ग्रस्त व भाजपच्या मस्तीखोर राजकारणाने त्रस्त झाला आहे. या विरुद्ध मी लढायला तयार आहे. लवकरच पवार साहेबांची भेट घेऊन पुढची दिशा ठरवणार.भाजपला चोपायची ही संधी मला सोडायची नाही'' असं टि्वटमध्ये म्हटलं आहे.

भाजपचे अकोल्याचे खासदार संजय धोत्रे(Sanjay Dhotre) प्रकृती अस्वस्थामुळे गेल्या दीड वर्षापासून सक्रीय राजकारणापासून दूर आहेत. आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच आता आमदार मिटकरी यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. 

मिटकरी यांना आपले मूळ गाव कुटासामध्येच अनेकवेळा राजकीय हादरे बसले आहेत. ऑक्टोबर २०२१ मध्ये जिल्हा परिषदेत कुटासा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रहारकडून पराभव झाला. ऑगस्ट २०२२ मध्ये गावाच्या सोसायटीच्या निवडणुकीतही त्यांच्या पॅनलाचा धुवा उडाला होता. नोव्हेंबर २०२२ मध्ये ग्रामविकास मंत्र्यांनी कुटासा गावातील १२ सदस्यांना अपात्र घोषित केले होते. त्यापैकी १० सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. 

Amol Mitkari
Atul Save News : मी मंत्री असलो तरी छत्रपती संभाजीनगरच्या मुद्यावर बोलवालं तिथे येईन..

कोण आहेत मिटकरी ?

अमोल रामकृष्ण मिटकरी यांनी शिवव्याख्याते ते विधान परिषदेचे आमदार असा प्रवास राहिलेला आहे. मिटकरी हे अकोला जिल्ह्यातील अकोटचे आहेत. ते २०१९ मधील महाराष्ट्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक होते. मराठा सेवा संघापासून सार्वजनिक जीवनात सक्रिय झालेल्या मिटकरी यांनी संभाजी ब्रिगेडमध्येही काम केले आहे. ते फुले-शाहू-आंबेडकरी विचारांना मानणारे आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकारणी आहेत.

महाराष्ट्र विधानपरिषदेचे मिटकरी हे सदस्य असून त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम केले आहे. २४ मे २०२० रोजी ते इतर ९ जणांसह महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची धडाडती तोफ म्हणून पाहिले जाते.

भाजपकडून २०२४ च्या लोकसभेची जोरदार तयारी

भाजपकडून 2024 च्या लोकसभा निवडणुकीला अवघे सोळा महिने शिल्लक राहिले आहे. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात भाजपची जय्यत तयारी सुरू असून लोकसभेत परत एकदा स्वबळावर सत्ता आणण्यासाठी एक वर्षापूर्वीपासून भाजपचे 'मिशन 144' काम सुरु झाले. या मिशन 144 अंतर्गत महाराष्ट्रातल्या 18 लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

दक्षिण मध्य मुंबई, मध्य मुंबई, पालघर, कल्याण, चंद्रपूर, हिंगोली, म्हाडा, बुलढाणा, धाराशिव औरंगाबाद, शिरूर, शिर्डी, बारामती, सातारा, हातकणंगले, कोल्हापूर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड महाराष्ट्रातील या मतदारसंघाचा त्यात समावेश आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेेचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविल्यामुळे भाजपची रणनीती काय असणार हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com