प्रशांत पवार म्हणाले, प्रवीण दटके म्हणजे भाजपचा शेर आमदार…

हा प्रश्‍न त्यांनी विधान परिषदेत लावून धरला. भाजपमधील (BJP) ते (Pravin Datke) शेर आमदार आहेत, असे जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रशांत पवार (Prashant Pawar) आज म्हणाले.
Prashant Pawar and MLA Pravin Datke

Prashant Pawar and MLA Pravin Datke

Sarkarnama

नागपूर : नागपूर महामेट्रोमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. गेल्या दीड वर्षापासून आम्ही त्यासाठी ओरडत आहोत. मोठमोठ्या नेत्यांना मेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रजेश दीक्षित दाद देत नाहीत. पण आता भाजपचे (BJP) शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके (Pravin Datke) यांनी मेट्रोतील भ्रष्टाचाराच्या विरोधात दंड थोपटले आहेत. हा प्रश्‍न त्यांनी विधान परिषदेत लावून धरला. भाजपमधील ते शेर आमदार आहेत, असे जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रशांत पवार (Prashant Pawar) आज म्हणाले.

आज पत्रकार परिषदेत प्रशांत पवार यांनी नागपूर (Nagpur) मेट्रोचे ब्रजेश दीक्षित यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, आमदार दटकेंनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले पाहिजे आणि सर्व ओबीसी नेत्यांचा निषेध केला पाहिजे. कारण सर्वच पक्षांतील ओबीसी नेते राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी रोजच ओरडत आहेत. पण मेट्रोमध्ये नोकरीतील आरक्षणावर गदा आली असताना सर्वच नेते मूग गिळून बसले आहेत. ब्रजेश दीक्षित यांनी जवळपास ९०० लोकांना थेट नोकरीत घेतले. हे करताना कुठेही आरक्षणाचा विचार झालेला नाही. त्यामुळे ओबीसी मुले, मुली त्यांच्या हक्कापासून वंचित राहिले आहेत. ओबीसीचे सर्वच पक्षांतील नेते ‘मॅनेज’ झाले आहेत, असा घणाघाती आरोपही प्रशांत पवार यांनी केला.

मेट्रोमध्ये जातीच्या आरक्षणानुसार भरती करावी, यासाठी आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार विकास ठाकरे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार परिणय फुके, ओबीसी नेते बबनराव तायवाडे, खासदार कृपाल तुमाने यांनी पत्र दिले. दिक्षीतांनी प्रत्येकाच्या पत्राला केराची टोपली दाखवली. युवक कॉंग्रेसच्या शिवाणी वडेट्टीवार आणि बंटी शेळके यांनी मोर्चे काढले. पण ब्रजेश दीक्षित कुणालाही जुमानले नाहीत. आमदार अभिजित वंजारी तर म्हणाले होते की, मेट्रोमध्ये ओबीसी मुलामुलींना नोकरी दिली नाही, तर मेट्रो बंद पाडेन. पण हल्ली आमदार वंजारीसुद्धा गायब झाले आहेत. त्यामुळे या सर्व नेत्यांनी दिक्षीतांसमोर हार मानली की ते ‘मॅनेज’ झाले, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला आहे.

<div class="paragraphs"><p>Prashant Pawar and MLA Pravin Datke</p></div>
प्रशांत पवार म्हणाले, रोक सको तो रोक लो…

माजी ऊर्जामंत्री आणि आमदार चंद्रशेखर बावनकुळे ओबीसीच्या राजकीय आरक्षणावर रोजच बोलत आहेत. पण येथे मेट्रोमध्ये नोकर भरतीत ओबीसींना डावलले जात आहे, हे त्यांना दिसत नाहीये का? आता त्यांनी ओबीसी मुलांना नोकरी देण्यासाठी पत्र द्यावे, अशी मागणी पवार यांनी केली आहे. भाजप आणि सर्वच पक्षांतील नेत्यांनी मेट्रोच्या दिक्षीतांसमोर शेपूट घातले असताना एकमेव आमदार प्रवीण दटकेंनी आवाज उचलला आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक केलेच पाहिजे. ओबीसी बांधवांना मेट्रोच्या संदर्भात आता केवळ आणि केवळ आमदार दटकेंकडून अपेक्षा आहेत. इतर सर्व ओबीसी नेत्यांचा निषेध ओबीसी बांधवांनी करावी, असे आवाहन प्रशांत पवार यांनी केले आहे.

आमदार दटके करणार आंदोलन...

मेट्रोच्या नोकरभरतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. हा प्रश्‍न नुकताच सभागृहात उपस्थित केलेला आहे. तात्काळ चौकशी न झाल्यास मेट्रोच्या विरोधातील तुमच्या आंदोलनात मी सहभागी होईल, असे आमदार दटकेंनी सांगितल्याचे प्रशांत पवार यांनी आज सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com