Prasad Lad News: ''...तर महाराष्ट्राशेजारी आणखी एक छोटा पाकिस्तान निर्माण झाला असता!''

Prasad Lad on Border Dispute : ... त्यावेळी तत्कालीन सरकार झोपलं होतं का?
Prasad Lad
Prasad LadSarkarnama

Prasad Lad News: स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल, स्वामी रामानद तीर्थ यांच्यासारख्या व्यक्तिमत्वांनी कठोर भूमिका घेतली नसती तर आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा लढला गेला नसता तर आज महाराष्ट्राशेजारी आणखी एक छोटा पाकिस्तान निर्माण झाला असता असे वक्तव्य विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. (Prasad Lad on Maharashtra Karnataka Border Dispute)

भाजप आमदार प्रसाद लाड(Prasad Lad) यांनी हिवाळी अधिवेशनाच्या विधीमंडळात सीमावादाचा मुद्दा मांडला. यावेळी ते बोलत होते. लाड म्हणाले, देशाच्या विभाजनापासून तेव्हाच्या सरकारने जी माती खाल्ली. ती माती आजही आपल्याला सारखी सारखी चाखायला लागते. हे आपलं दुर्देव आहे. भाषावार प्रांतरचना करत असताना देशाच्या स्वातंत्र्यांनतर ज्या काही विभाजन करण्यात आलं. त्यावेळी तत्कालीन सरकारकडून महाराष्ट्रावर अन्याय झाला का याचा जाब इतिहास निश्चितपणे विचारणार आहे.

Prasad Lad
Maharashtra Congress : गटातटाच्या राजकारणाला मूठमाती दिली तरच महाराष्ट्रात काँग्रेसला भवितव्य !

सोलापूरमधील काही गावं कर्नाटकमध्ये जात आहे असं आपण म्हमत आहोत. पण तो ठराव आज झालेला नाही. तो निर्णय 2012 साली झाला आहे. त्यावेळी कुणाचं सरकार होतं. का त्या गावांना का पाणी दिलं नाही. ज्या गावांचा पाण्याचा प्रश्न सोडविला नाही. त्या गावांकडे लक्ष दिलं गेलं नाही. फक्त धरणांच्या घोषणा झाल्या,त्यावर टीका टिप्पणी करत महाराष्ट्रातील शेतकर्यांवर अन्याय केला. ज्या गावांनी कर्नाटक सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी तत्कालीन सरकार झोपलं होतं का? असा सवालही लाड यांनी केला.

उध्दव ठाकरेंवर आरोप करताना लाड म्हणाले, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सीमावादाच्या मुद्द्यावरुन का होईना पण विधान परिषदेत अधिवेशनात आले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर त्यांनी लाठी काठी खाल्ल्या तेव्हा ते शिवसेनेत होते. पण आता सीमांतर केल्यानंतर किती लाठ्या काठ्या खाल्ल्या अशी टीका टिप्पणी केली. पण एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी लाठ्या काठ्या तर खाल्ल्याच शिवाय ते 40 दिवस तुरुंगात देखील राहिले. त्यांच्यासोबत छगन भुजबळ देखील होते असा टोलाही लाड यांनी ठाकरेंना लगावला.

Prasad Lad
Winter Session 2022 : भष्ट्राचाराचा आरोप असलेले अब्दुल सत्तार आज उत्तर देणार का ?

काँग्रेसने सातत्याने बोटचेपी भूमिका राहिली. कोणत्याही मुदद्यावर चर्चा करायची नाही. संवाद करायचा नाही. सातत्याने कोणता न् कोणता मुद्दा धजत ठेवायचा. आणि जोपर्यंत त्यातील संवेदना मरत नाही, त्यांचा खात्मा होत नाही, तोपर्यंत त्या मुद्दयाला हात घालायचा नाही असं काँग्रेसचं धोरण राहिलं आहे असा आरोपही लाड यांनी काँग्रेसवर केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com