नवनीत राणा विरद्ध प्रणिती शिंदे सामना रंगणार?

Praniti Shinde| Navneet Rana| 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला आणि खासदारकी मिळवली.
नवनीत राणा विरद्ध प्रणिती शिंदे सामना रंगणार?
Praniti Shinde| Navneet Rana|

अमरावती : गेल्या आठवड्यात शिर्डीत कॉंग्रेसचे चिंतन शिबीर पार पडले. या शिबीरात प्रदेश सचिव नंदकिशोर कुयटे यांनी आगामी 2024 मधील लोकसभा निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे यांना अमरावतीमधून लोकसभेची उमेदवारी द्यावी, असे पत्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिले आहे. त्यामुळे खासदार नवनीत राणा यांची राजकीय कोंडी करण्याचे प्रयत्न कॉंग्रेसकडून सुरु झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरु आहे. आता या मागणीवर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Praniti Shinde and Navneet Rana latest political news)

2019 मध्ये नवनीत राणा यांनी अमरावती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकूनही आल्या. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने नवनीत राणांनी ही निवडणूक लढवली. पण आता नवनीत राणांनी भाजपला जवळ केल्याने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. अमरावतीत हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करून एक वेगळेच वातावरण निर्माण करण्याचे काम राणांनी केल्यामुळे त्यांच्याबाबत नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

Praniti Shinde| Navneet Rana|
राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आघाडीची ऑफर भाजप स्वीकारणार का?

शिर्डीमध्ये काँग्रेसचे दोनदिवसीय चिंतन शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात नंदकिशोर कुयटे यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणांविरोधात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी निवडणूक लढवावी, या मागणीचे पत्र नाना पटोले आणि प्रणिती शिंदेंना दिलं आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासून सुरु केल्यास तिथे काँग्रेसचा खासदार निवडून येऊ शकतो, असा दावाही नंदकिशोर कुयटे यांनी केला आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला आणि खासदारकी मिळवली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने नवनीत राणा यांना पाठिंबा दिला होता. त्याआधी 2014 मध्येही नवनीत राणांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांना आनंदराव अडसूळ यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. अमरावती लोकसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून तो काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत अमरावती राष्ट्रवादी काँग्रेस साठी सोडण्यात आला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना कॉंग्रेसला हा मतदार संघ देणार का हे देखील मोठे आव्हान आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in