
Akola District Prakas Ambedkar News : वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. आंबेडकर यांनी ओबीसी परिषदेत खासगीकरण, शिक्षणावरून सरकारवर टिका केली. राज्यकर्ते होणयाची हाेण्याची मानसिकता आवश्यक असून, मतांच्या अधिकाराचा वापर करा, असे आवाहन त्यांनी ओबीसी बांधवांना केले.
वाडेगाव येथे ओबीसी महासंघ आणि अत्यल्प समाज संघटनेतर्फे अवलिया अर्जुन महाराज संस्थानमध्ये परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलताना ॲड. आंबेडकर यांनी, आरक्षणामुळे ओबीसी शिक्षित झाला असला तरी खासगीकरणामुळे त्याला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवले जात असल्याचे सांगितले.
दाेन काेटी नाेकऱ्या संपवून २० हजार शिक्षकांची भरती हाेणार आहे. परदेशात शिकण्यासाठी जाणारे विद्यार्थी जवळपास साेबत २४ हजार काेटींचे भारतीय (India) चलनही घेऊन जातात. सरकार (Government) भारतात नवीन विद्यापीठ सुरू करीत नसून, शिक्षणावरील बेजटेही कमी केले, असेही ॲड. आंबेडकर (Prakash Amedkar) म्हणाले.
परिषदेला प्रामुख्याने प्रा. डॉ. अंजली आंबेडकर, गोपाल राऊत, बालमुकुंद भिरड, ॲड. संताेष राहाटे, रेखा ठाकूर, जि.प. अध्यक्षा संगिता अढाऊ, प्रमाेद देंडवे, निलेश विश्वकर्मा, अशोक सोनोने, प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, राजेंद्र पातोडे, अमित भुईगड, निशा शेंडे, अरूंधती सिरसाट आदींची उपस्थिती होती.
परिषदेत घेण्यात आलेले ठराव -
ओबीसी व अत्यल्प समाजाची जात निहाय जनगणना झाली पाहिजे. ओबीसी व अत्यल्प समाजामध्ये पूजा करणाऱ्या मंडळींना पुजारी, पुरोहित म्हणून मान्यता प्रदान करावी. ओबीसी व अत्यल्प समाजातील विधवांचा पुनर्विवाह करण्यासाठी आई-वडिल व सासू-सासरे यांनी प्रयत्न करणे. ओबीसी व अत्यल्प समाजातील सुरू असलेली बोकुड बळी प्रथा बंद करणे. ओबीसी व अत्यल्प समाजाच्या ताब्यातील मंदिरामध्ये ओबीसी व अत्यल्प समाजातील पुजारी, पुराेहित यांच्याकडून मंदिरात पूजा करणे. ओबीसी, अत्यल्प समाजातील चुकीच्या रूढी, प्रथा, परंपरा रद्द करणे. ओबीसी व अत्यल्प समाजातील बांधवांनी गाव तिथे अभ्यासिका हा उपक्रम राबविण्यात यावा. विद्येची आराद्य दैवत म्हणून प्रत्येक कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करा. सत्यशोधक कीर्तनकार प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात करा. गावातील जिल्हा परिषदच्या शाळा वाचविण्यासाठी प्रयत्न करा. ओबीसी व अत्यल्प समाजातील पोट शाखा, पोटजातीमध्ये रोटी-बेटी व्यवहार करा. क्रिमीलेअरची अट रद्द व्हावी. ओबीसी व अत्यल्प समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या िवद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करावी.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.