मोठी बातमी : प्रकाश आंबेडकरांना ED ची नोटीस : म्हणाले, "### दम असेल तर मला उचला"

Prakash Ambedkar | Vanchit Bahujan Aaghadi | ED : ईडीला आव्हान देताना प्रकाश आंबडेकरांची जीभ घसरली
Prakash Ambedkar | Vanchit Bahujan Aaghadi
Prakash Ambedkar | Vanchit Bahujan AaghadiSarkarnama

अमरावती : राज्यात महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा कायम आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, मंत्री नवाब मलिक हे कारागृहात आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरुन सातत्याने महाविकास आघाडी विरुद्ध भाजप संघर्ष पाहायला मिळत आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही आपल्याला ईडीची नोटीस आली असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. ते अमरावतीमध्ये बोलत होते.

प्रकाश आंबडेकर म्हणाले, देशात भाजपने दडपशाहीचे राजकारण सुरू केले आहे. उठ सूट कोणालाही ईडीच्या नोटीस दिल्या जातात. भाजपाने देशात मोकळं वातावरण ठेवले नाही. मलाही ईडीची नोटीस दिली होती. पण ### दम असेल मला उचलून दाखवून कारवाई करावी. मग बघा काय होते ते, असे म्हणतं आंबडेकर यांनी भाजपला आणि तपास यंत्रणांना थेट आव्हान दिले. मात्र यावेळी आंबेडकर यांची जीभ घसरली होती.

Prakash Ambedkar | Vanchit Bahujan Aaghadi
'सरकारनामा' पोल : संभाजीराजेंची अपक्ष भूमिका योग्य; शिवसेनेची उमेदवारी स्वीकारु नये

प्रकाश आंबेडकर काँंग्रेसकडून राज्यसभेवर जाणार नाहीत :

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यात काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या एका जागेवरुन प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र या केवळ चर्चा आणि अफवा असल्याचे आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले असून या वृत्ताचे खंडनही करण्यात आले आहे.

Prakash Ambedkar | Vanchit Bahujan Aaghadi
प्रकाश आंबेडकर काँग्रेसकडून राज्यसभेवर? वंचित बहुजन आघाडीने स्पष्टचं सांगितले!

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे याबाबत बोलताना म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची बातमी माध्यमांमधून प्रसारित करण्यात आली आहे. मात्र या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही. काँग्रेसकडून आम्हाला असा कोणताही प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही. निवडणुका जवळ आल्या की काँग्रेसमधील एक गट माध्यमातील काही लोकांना हाताशी धरून खोट्या बातम्या पेरण्याचे काम करीत असतो. अशा खोट्या बातम्या पेरून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा व वंचित बहुजन आघाडीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com