विदर्भाच्या नावावर राजकीय पोळ्या शेकल्या, आता गुजरातच्या साहेबांचे आदेश पाळतात !

आता त्यांच्यासाठी गुजरातच्या साहेबांचे आदेश महत्वाचे झाले आहेत, अशी घणाघाती टीका प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केली आहे.
Atul Londhe and Devendra Fadanvis
Atul Londhe and Devendra FadanvisSarkarnama

नागपूर : वेदांता फॉक्सकॉन पाठोपाठ आता टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातला पळवून नेण्यात आला आहे. एके काळी देवेंद्र फडणवीसांनी विदर्भातील अनुशेषाच्या मुद्द्यावर आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या होत्या आणि आता त्यांच्यासाठी गुजरातच्या साहेबांचे आदेश महत्वाचे झाले आहेत, अशी घणाघाती टीका प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी केली आहे.

टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातला (Gujrat) वळवल्यापासून राज्य सरकारवर (State Government) टीकेची झोड उठत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडणे सुरू केले आहे. युवक कॉंग्रेस (Youth Congress) चांगलीच आक्रमक झाली आहे. काल युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नागपूर (Nagpur) येथील रामगिरी या निवासस्थानाच्या फलकावर गुजरातचे मुख्यमंत्री अशा पाट्या झळकावल्या. याशिवाय महाविकास आघाडीतील इतर नेतेही सत्ताधाऱ्यांवर चांगलेच तोंडसुख घेत आहेत.

विदर्भातील प्रकल्प गुजरातला पाठवणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापुढची निवडणूक नागपूरपेक्षा गुजरातमधून लढवावी, असा खोचक टोलाही लोंढे यांनी लगावला. विरोधात असताना देवेंद्र फडणवीस आणि भाजपने वेगळा विदर्भ आणि विदर्भाच्या अनुशेषाच्या मुद्द्यावर आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यावर त्यांना विदर्भाचा विसर पडला. नागपूरमध्ये होणारा टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. फडणवीसांसाठी विदर्भातील जनतेपेक्षा गुजरातच्या साहेबांचे आदेश महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्यांनी पुढची निवडणूक गुजरातमधून लढवावी, अतुल लोंढे यांनी केली आहे.

Atul Londhe and Devendra Fadanvis
अतुल लोंढे म्हणाले, एमआयएमने काँग्रेसची चिंता करू नये...

देवेंद्र फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री असताना एकही मोठा प्रकल्प विदर्भात आला नाही. विदर्भातल्या तरुणांना रोजगार मिळाला नाही. रामदेवबाबा यांच्या पतंजलीचा मोठा प्रकल्प नागपूरमध्ये येणार, असे सांगितले होते. पण तो अद्याप आला नाही. अमरावतीतील टेक्सटाईल पार्क औरंगाबादच्या ऑरिक सिटीमध्ये घेऊन जाण्याचा घाट या सरकारने घातला आहे. भाजप सरकारच्या काळात विदर्भात एकही नवा प्रकल्प आला नाही. तरुणांना रोजगार मिळाला नाही. याउलट महाविकास आघाडी सरकारने आणलेला टाटा एअरबसचा २२ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प मोदींच्या आदेशाने गुजरातला गेला असल्याचे लोंढे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com