आरोपींना पकडण्यासाठी गेले पोलिस; पण तेथे मटण बघून सुटले तोंडाला पाणी, अन् मग...

भंडाऱ्याचे (Bhandara) उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांना वाळू माफियांनी मारहाण केली. त्यानंतर राज्यात वाळू तस्करी पुन्हा चर्चेत आली.
Bhandara Police
Bhandara PoliceSarkarnama

भंडारा : काल पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास भंडाऱ्याचे (Bhandara) उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांना वाळू माफियांनी (Sand Mafiya) मारहाण केली. त्यानंतर राज्यात वाळू तस्करी पुन्हा चर्चेत आली. आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी आरोपींसोबत मटण पार्टी केल्यामुळे तस्करांसोबत पोलिसही चर्चेत आले आहेत.

त्या पार्टीचे व्हिडिओ स्थानिक आमदारांनी प्रसारमाध्यमांना दिले. कर्तव्यात कसूर करून आरोपींना अभय देणाऱ्या असा पोलीस (Police) कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे. आमदारांनी प्रसारमाध्यमांना दिलेला व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ दाखवत पोलिस आणि वाळू माफिया यांचे संबंध किती सुमधुर आहेत, याची प्रचिती आली, असे आमदार भोंडेकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना पवनी पोलिस कसे पकडतील, असा प्रश्न त्यांनी केला आहे.

विशेष म्हणजे पार्टी करताना त्या पोलिस कर्मचाऱ्यांनी केले संभाषण मोठा धक्कादायक खुलासा करणारे आहे. ‘ही घटना म्हणजे चिल्लर आहे, तुमसर पोलीस स्टेशनला असताना अनेक आरोपींची नावे स्वतः उडविली आहेत. पण आपण सल्ला देणे म्हणजे घरावर गोटे आणण्यासारखे आहे’, असे एक पोलिस कर्मचारी सहकाऱ्यांना सांगत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. या व्हिडिओने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. वाळू तस्करीसारख्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये पोलिस अशाच प्रकारे आरोपींना वाचवत असावे, असा लोकांचा समज आता दृढ होत चालला आहे.

काल पहाटे 3:30 मिनिटांच्या दरम्यान भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्यावर 20 ते 25 वाळू माफियांनी हल्ला चढवत पावडे, दगड आणि काठ्यांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. उपविभागीय अधिकाऱ्यांनासुद्धा मारहाण करण्यात आली. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी राठोड यांनी पवनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपींच्या शोधात पथक रवाना केले. मग काय पोलिसांना आरोपी गवसला त्याला पकडून आणण्यापेक्षा पोलिसांनी त्याच्यासोबत एका हॉटेलमध्ये पार्टी केली अन् मटणावर ताव मारला.

Bhandara Police
कर्जतमध्ये पोलिसच निघाला वाळू तस्कर

हा सर्व प्रकार व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत असल्याच्या आरोप आमदार भोंडेकर यांनी केला आहे. विशेष म्हणजे तुमच्या किरकोळ विषय आहे तुमसर पोलीस स्टेशनला असताना अनेक आरोपींची नावे उडविली, असा खुलासाच एका पोलिस कर्मचाऱ्याने केला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी गृहमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com