राणा दांपत्यास पोलिस अमरावतीतच रोखणार : वाद रोखण्यासाठी उचलणार पाऊल

आमदार राणा आणि खासदार नवनीत राणा या दोघांनी ‘मातोश्री’समोर येऊन हनुमान चालिसाचे पठण करण्याचा इशारा दिलेला आहे. त्यासाठी त्यांनी उद्या मुंबईकडे जाणार असल्याचे जाहीर केले आहे.
राणा दांपत्यास पोलिस अमरावतीतच रोखणार : वाद रोखण्यासाठी उचलणार पाऊल
Ravi Rana-Navneet RanaSarkarnama

अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री (Matoshri) या निवास स्थानासमोर जाऊन येत्या २३ एप्रिल रोजी हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्धार खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवि राणा (Ravi Rana) यांनी केला आहे. त्यासाठी ते उद्या (ता. २२ एप्रिल) रात्री विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईला जाणार आहे. तर, शिवसेनेकडून (shivsena) राणा दांपत्यांना मातोश्रीपासून लांब ठेवण्यासाठी बैठका घेऊन नियोजन केले आहे. दुसरीकडे, पोलिस प्रशासनही राणा पती-पत्नीस अमरावतीतच (Amravati) रोखणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Police to stop Rana couple in Amravati : Steps to be taken to prevent dispute)

आमदार राणा आणि खासदार नवनीत राणा या दोघांनी ‘मातोश्री’समोर येऊन हनुमान चालिसाचे पठण करण्याचा इशारा दिलेला आहे. त्यासाठी त्यांनी उद्या मुंबईकडे जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर अमरावतीत आज शिवसेना व युवा सेनेच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली.

Ravi Rana-Navneet Rana
पालिका निवडणूक : प्रभाग रचनेसंदर्भात सरकार सुधारित शपथपत्र सादर करणार

अमरावती येथील विश्राम गृहात झालेल्या या महत्वाच्या बैठकीस शिवसेना आणि युवा सेनेचे महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. कोणत्याही परिस्थितीत आमदार रवी राणा मुंबई मातोश्रीवर जाण्यापासून रोखण्याची तयारी शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे.

Ravi Rana-Navneet Rana
राष्ट्रवादी इचलकरंजी विधानसभेची जागा लढवणार : जयंत पाटलांची घोषणा

आमदार रवी राणा उद्या मुंबईला रवाना होणार आहेत. त्यांना अमरावती रेल्वे स्टेशनवर रोखण्यासाठी जिल्हाभरातील शिवसैनिक स्टेशनवर जमणार आहेत. त्यामुळे अमरावतीत उद्या शिवसेना विरुद्ध राणा कार्यकर्ते आमने सामने येण्याची शक्यता आहे.

Ravi Rana-Navneet Rana
महाआघाडीतून बाहेर पडण्यापूर्वी शरद पवार, सोनिया गांधींना पत्र लिहिले होते : शेट्टी

दुसरीकडे, राणा दाम्पत्य व शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यावर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. उद्या आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांना मुंबईत मातोश्रीवर जाण्यापूर्वीच अमरावतीत पोलिस रोखणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राणा दांपत्यांच्या सर्व हालचालीवर आज रात्रीपासून अमरावती पोलिसांची नजर असणार आहे. नवनीत आणि रवी राणा हे उद्या रात्री ७ वाजता विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईत जाणार असल्याचे सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.