मातृतीर्थावरून निघणारी रॅली अडवली; भाजप प्रवक्ते वाघ पोलिसांच्या ताब्यात..

भाजपचे (BJP) प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी दोन दिवसांपूर्वी मातृतीर्थ ते शिवतीर्थ रॅली काढून सरकारचा (Maharashtra Government) निषेध करणार असल्याचे जाहीर केले होते.
BJP Spokeperson Vinod Wagh
BJP Spokeperson Vinod WaghSarkarnama

सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात त्यांचेच पुतळे गावोगावी बसवण्यास राज्य सरकार का विरोध करते, म्हणून भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी सरकारला धडा शिकवण्यासाठी शिवजयंतीचा मुहूर्त साधत मातृतीर्थ सिंदखेड राजा ते शिवनेरी अशी रॅली काढणार होते. मात्र रॅलीला सुरुवात होणार त्याचवेळी सिंदखेड राजा (Sindkhed Raja) पोलिसांनी रॅलीला परवानगी नाही, तरी रॅली का काढली, म्हणून रॅली अडविली आणि प्रवक्ते विनोद वाघ यांना ताब्यात घेतले.

आज झालेल्या या प्रकारामुळे काही काळ राजवाडा परिसरामध्ये तणावसदृष वातावरण निर्माण झाले होते. राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळे बसविले गेले आहेत. शासन पुतळे बसवण्यासाठी परवानगी देत नसल्याने बसवलेले पुतळे सरकारने काढून घेतले आहेत. दरम्यान, सरकारच्या या कारवाईविरुद्ध आवाज उठविण्यासाठी भाजपचे (BJP) प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी दोन दिवसांपूर्वी मातृतीर्थ ते शिवतीर्थ रॅली काढून राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवरायाला अभिवादन करत सरकारचा निषेध करणार असल्याचे जाहीर केले होते.

तालुक्यातून शेकडो गाड्या व कार्यकर्ते शहराकडे रवाना झाले होते त्या ठिकाणी विनोद वाघ यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन केले. राजवाड्यासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याच ठिकाणी वाहनांची व कार्यकर्त्याची गर्दी जमली होती. राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपतींच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. रॅलीला मातृतिर्थापासून सुरुवात होणार होती. त्यावेळी ठाणेदार केशव वाघ हे पोलीस कर्मचाऱ्यांसह राजवाडा परिसरामध्ये दाखल झाले. रॅलीसाठी कोणतीही परवानगी दिली नसल्यामुळे रॅली काढण्यात येऊ नये, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

BJP Spokeperson Vinod Wagh
छत्रपतींचा अवमान सहन करणार नाही, सिंदखेड राजा ते शिवनेरी काढणार रॅली...

विनोद वाघ हे रॅली काढण्यावर ठाम होते. पोलिसांसोबत त्यांची शाब्दिक चकमकही उडाली. त्यावेळी विनोद वाघ त्यांनी पोलिसांना सांगितले की, राज्यात महाविकास आघाडीचे नेते पत्रकार परिषदा घेतात, त्याला हजारो लोक बोलवले जातात. त्यांना कोणी अडवत नाही. परंतु मातृतीर्थ ते शिवनेरी पर्यत रॅली काढण्यासाठी अडविण्यात येते. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये रॅली काढणार असल्याचे सांगताच पोलीस प्रशासन व शिवप्रेमींमध्ये एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी जबरदस्तीने त्यांना वाहनांमध्ये बसवून पोलीस स्टेशनला घेऊन गेले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाडीला अडवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना बाजूला करत ठाणेदार वाघ यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले. यावेळी भाजपाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com