Aarti Singh|रवी राणा वचपा काढणार; पोलीस आयुक्त आरती सिंग यांना सूचक इशारा

Amaravati Police| Aarti Singh| पोलिसांच्या कुटूंबियांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर रवी राणांनी हा इशारा दिला आहे
Amaravati Police| Aarti Singh| Ravi Rana
Amaravati Police| Aarti Singh| Ravi Rana

अमरावती : अमरावतीतील बेपत्ता तरुणीच्या जबाबानंतर राजापूर पोलीस स्टेशनमध्ये राडा घालणाऱ्या नवनीत राणा तोंडघशी पडल्या. मुलीच्या जबाबानंतर अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग (Aarti Singh) यांनी संबंधित मुलगी ही स्वतः घरातून निघून गेल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचेही स्पष्ट केले. तर दूसरीकडे खासदार राणांनी पोलिसांवर केलेल्या आरोपांमुळे पोलीस कुटूंबियही चांगलेच आक्रमक झाले होते.

खासदार राणा आणि पोलिसांच्या या वादानंतर आता आमदार रवी राणा नवनीत राणांच्या मदतीला धावले आहेत. रवी राणांनी पोलिसांविरोधात आणखी आक्रमक भूमिका घेत गणपतीनंतर अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह (Aarti Singh) यांची उचलबांगडी करण्याचा इशारा दिला आहे. शुक्रवारी अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आरती सिंग यांच्याबाबत हे वक्तव्य केलं आहे.

बेपत्ता तरुणीला शोधण्यात अमरावती पोलिसांची कुठलीही कामगिरी नाही. सातारा सातारा पोलीस आणि रेल्वे पोलिसांनीही मुलगी शोधली. अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंह यांचे यात काहीच कर्तृत्त्व नाही. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये आरती सिंग यांनी केवळ वसुली केली. पण आता सिंगे यांचे हे वसुली पथक आता शिंदे-फडणवीस सरकार मध्ये बंद होणार आहे. गणपती उत्सवानंतर आरती सिंह यांची उचलबांगडी होईल, असा सूचक इशारा रवी राणा यांनी दिला.

काय आहे प्रकरण

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि भाजपाच्या (BJP) अनेक नेत्यांनी कथित 'लव जिहाद' प्रकरणावरून अमरावती पोलिसांवर (Police) गंभीर आरोप केले होते. पोलिसांच्या तपासानंतर संबंधित मुलीला सातारा रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले आणि तिला अमरावती येथे आणण्यात आले. मुलीने, आपण रागाच्या भरात घरातून निघून गेल्याचा जबाब दिला. तसेच, आपल्यासोबत कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचेही तिने सांगितले. मुलीच्या जबाबनंतर आयुक्त आरती सिंग यांनी या प्रकरणावर पोलिसांच्या वतीने पहिली प्रतिक्रिया दिली. संबंधित मुलगी ही स्वतः घरातून निघून गेली होती. त्यामुळे नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.

मुलीच्या जबाबनंतर दूसरीकडे पोलिसांचे कुटूंबीय चांगलेच आक्रमक झाले होते. तुम्हाला गरज नसेल तर ते पोलिस संरक्षण काढून टाका, प्रत्येक वेळी पोलीस संरक्षण करता ना, तर कधी हेच पोलीस संरक्षण बाजूल करुन पहा आणि जनतेत येऊन दाखवा, मग तुम्हाला समजेल पोलीस नसल्यावर काय होतं ते. तुम्ही तुमचा माज कमी करा, अशा शब्दांत पोलीस पत्नीनेही खासदार नवनीत राणांवर आगपाखड केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in