...तर राज ठाकरेंना लोकांनी डोक्यावर घेतले असते, पण?

आधी चाकू मारायचा आणि मग म्हणायचे की, खून करण्याचा माझा उद्देश नव्हता, रक्त काढण्याचा उद्देश नव्हता, याला काही अर्थ आहे का, असा सवाल बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केला.
Bacchu Kadu on Raj Thackeray, Bacchu Kadu Latest Marathi News
Bacchu Kadu on Raj Thackeray, Bacchu Kadu Latest Marathi NewsSarkarnama

नागपूर : भोंग्यांवरून राज्यातील राजकारण तापवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना साध्य काय करायचे आहे, ते कळत नाही. ते म्हणतात की, ‘होऊन जाऊ द्या...’ याचा अर्थ काय समजायचा, असा सवाल प्रहार संघटनेचे अध्यक्ष, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. (Bacchu Kadu Latest Marathi News)

यासंदर्भात बोलताना राज्यमंत्री कडू (Bacchu Kadu) म्हणाले, एकीकडे म्हणायचे की, आम्हाला दंगली घडवायच्या नाहीत आणि मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी अल्टीमेटम द्यायचा, मशिदींसमोर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) दुप्पट आवाजात लावण्याचा अट्टहास धरायचा. यावरून काय समजायचे ते जनता समजू लागली आहे. पण भोंग्यांवरून राजकारण न तापवताही राज ठाकरेंना (Raj Thackeray) हे काम करणे सहज शक्य होते.

राज ठाकरेंना भोंग्यांचा विषय हाताळायचाच होता, तर त्यांनी सर्व धर्मगुरूंची एकत्र बैठक घ्यायला हवी होती. तेथे चर्चेतून हा मुद्दा सहज सोडवता आला असता, पण त्यांना असे न करता महाराष्ट्राचे राजकारण गढूळ करायचे होते का, असा प्रश्‍न पडतो. आधीच आपला देश आणि राज्य आर्थिक संकटांना तोंड देतोय. देशाला आणि राज्याला आता दंगली परवडण्यासारख्या नाहीत. आता काय केव्हाही दंगली होऊ नयेत. आधी चाकू मारायचा आणि मग म्हणायचे की, खून करण्याचा माझा उद्देश नव्हता, रक्त काढण्याचा उद्देश नव्हता, याला काही अर्थ आहे का, असा सवाल बच्चू कडू यांनी केला.

Bacchu Kadu on Raj Thackeray, Bacchu Kadu Latest Marathi News
एक रुपयाचा जरी भ्रष्टाचार केला असेल तर हात कलम करेल : बच्चू कडू

राज ठाकरे यांनी भोंग्‍यांच्या विषयाचे राजकारण करायला नको होते. सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांनी आवाहन करायचे असते. सर्वांना एकत्र बसवून चर्चा घडवून आणायला हवी होती. आपल्या देशात सर्व जाती धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. त्यामुळे त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला असता. यातून जातीय सलोखा राखता आला असता. या पद्धतीने त्यांनी हा विषय हाताळला असता, तर या देशातल्या लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले असते. पण आता त्यांनी इशारे देऊन राज्यातील वातावरण खराब केले आहे. यातून काही अघटित घडल्यास त्याची जबाबदारी राज ठाकरेंवर निश्‍चित केली पाहिजे, असेही राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com