MLA Sanjay Gaikwad यांच्याबद्दल जनताच काय तो निर्णय घेईल…

Buldana : संजय गायकवाड यांची शिवीगाळ करीत असल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
Praful Patel and Sanjay Gaikwad
Praful Patel and Sanjay GaikwadSarkarnama

MLA Sanjay Gaikwad News : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची अश्‍लाघ्य भाषेत शिवीगाळ करीत असल्याची कथित ऑडिओ क्लिप सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. यासंदर्भात आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांना विचारले असता, आमदार संजय गायकवाड आणि त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीबद्दल जनताच काय तो निर्णय घेईल, असे ते म्हणाले.

आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांची ही पहिली वेळ नाही. आपल्या विचित्र बोलण्यामुळे नेहमीच ते चर्चेत असतात. वारकऱ्यांबद्दलचे वक्तव्य असो किंवा अधिकारी, कर्मचाऱ्यांशी बोलणे. शिव्या देऊन बोलणे, ही त्यांची पद्धत आहे. त्यांचे संस्कार तसे असावे, त्यामुळे ते शिव्या देऊन सतत वाद ओढवून घेतात किंवा असे करून आपण चर्चेच राहतो, अशी त्यांची धारणा असावी. त्यामुळे अधूनमधून मिडियामध्ये चर्चेत राहण्यासाठी ते मुद्दामहून असे करत असावे, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

अनिल गंगोत्री या शेतकऱ्याने आमदार संजय गायकवाड यांना फोन करून बोदवड उपसा सिंचनाबद्दल विचारणा केली असता, संजय गायकवाड यांनी फोनवर शेतकऱ्याला शिवीगाळ केली. त्याचा निषेध करण्यात येत आहे. आगामी निवडणुकांबद्दल बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, महाविकास आघाडीचे पुढचे स्वरूप काय राहील, आणखी कोणते पक्ष सोबत येतील, हे आज सांगणे शक्य नाही. पण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे तीन पक्ष सोबत राहतील, ने मात्र निश्‍चित, असे ते म्हणाले.

Praful Patel and Sanjay Gaikwad
मुख्यमंत्र्यांपुढे बॅनर फडकाविणे कोणत्या शिस्तीत बसते? : संजय गायकवाड

शेकाप, समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पार्टीचेही काही लोक, असे मित्रपक्षही सोबत असणार आहेत, असेही पटेल यांनी सांगितले. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम शासकीय स्तरावर साजरा करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. याबाबतीत विचारले असता, हा निर्णय स्वागतार्ह आहे, असे ते म्हणाले. विरोधासाठी विरोध ही आमची भूमिका नाही. जे चांगले आहे, त्याचे कौतुक करणे ही आमच्या पक्षाध्यक्षांची शिकवण आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या उपरोक्त निर्णयाचे मी स्वागत करतो, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com