
Nagpur Political News : राष्ट्रवादी कॉंग्रेस - अजित पवार गटाचे शहराध्यक्ष म्हणून ‘जय जवान जय किसान’ संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांची नियुक्ती झाली. त्यांच्यासोबत कार्याध्यक्ष म्हणून युवा नेते श्रीकांत शिवणकर यांना नियुक्त करण्यात आले. नवनियुक्त अध्यक्ष पवार यांनी कामकाज सुरू करताच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टोलेबाजी सुरू केली आहे. (NCP was in the city of Nagpur from a long time ago)
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यालयात आज (ता. २६) प्रशांत पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी कॉंग्रेस फार पूर्वीपासून नागपूर शहरात होती. पण मध्यंतरीच्या काळात नागपुरातील राष्ट्रवादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली.
त्यामुळे पक्षाचा विकास खुंटला. येवढ्या मोठ्या महानगरपालिकेत केवळ एक नगरसेवक असल्याची नामुष्की पक्षावर ओढवली. काही नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष वाढूच दिला नाही, असा टोला प्रशांत पवार यांनी अनिल देशमुख यांचे नाव न घेता लगावला.
आता शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस मजबूत झालेली आहे. अजित पवार गट नागपुरात विधानसभेच्या दोन जागा लढवणार आहे. पूर्व नागपूर आणि पश्चिम नागपूर या दोन मतदारसंघात लढण्याची तयारी आम्ही सुरू केली आहे. आता राष्ट्रवादी हा पक्ष पूर्वीसारखा राहिलेला नसून सशक्त झालेला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच उमेदवारही निश्चित करणार असल्याचे पवार म्हणाले.
आमचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नांनी नागपूर शहरात संघटन सक्रिय झाले आहे. आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो. त्यामुळे राष्ट्रवादीला गतवैभव प्राप्त झाले. आमचा कोणताही गट नाही. आम्ही तन, मन, धनाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहो. अजित पवार यांच्या नेतृत्वात आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विस्तार करणार आहो. महानगरपालिका निवडणुकीतही राष्ट्रवादीला चांगले यश मिळेल, असा विश्वास प्रशांत पवार यांनी व्यक्त केला.
आता नागपुरात (Nagpur) राष्ट्रवादीचे आमदार होतील, नगरसेवकांचीही संख्या वाढेल. दो सप्टेंबरला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) अजित पवार (Ajit Pawar) गटाचा मेळावा होणार आहे. खासदार प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांच्या नेतृत्वात हा मेळावा होईल. या मेळाव्यासाठी आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत. विरोधकांना धडकी भरवणारा हा मेळावा असणार आहे, असे प्रशांत पवार (Prashant Pawar) यांनी सांगितले.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.