Patole News : सोमय्यांकडे ईडीची कागदपत्रं कशी पोहोचतात? कॉंग्रेस आक्रमक, सोमवारी राज भवनावर धडकणार !

Kirit Somayya : किरीट सोमय्यालांना कसं माहीत होतं?
Nana Patole and Kirit Somayya
Nana Patole and Kirit SomayyaSarkarnama

The High Court has also raised questions on this : ईडी आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून देशात काय राजकारण केले जात आहे. हे आता देशातल्या प्रत्येक माणसाला माहिती झाले आहे. आता तर उच्च न्यायालयानेही यावर प्रश्‍न उपस्थित केले आहेत, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग या मुद्द्यावर सोमवारी १३ मार्चला मुंबईत राज्यपाल भवनासमोर कॉंग्रेस आंदोलन करणार आहे. कालच उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित करत ईडीच्या कारवाया संदर्भातले कागद किरीट सोमय्याकडे कसं काय पोहोचतात? ईडीची कारवाई कुठे होणार, हे कोणालाच माहीत नसताना किरीट सोमय्यालांना कसं माहीत होतं? असे प्रश्न न्यायालयाने विचारले असल्याचे नाना पटोले म्हणाले.

आज नागपुरात पटोले पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, जमिनीवर भाजपचा बेस संपला आहे म्हणून ते विरोधकांना घाबरवण्यासाठी अशा कारवाया करत आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे ताजे उदाहरण आपल्यासमोर आहे. शंभर कोटींचा आरोप केला. मात्र त्यात काहीच मिळाले नाही. परमवीर सिंहाची चौकशीच केली नाही आणि निरपराध माणसाला दीड वर्ष तुरुंगात ठेवले. हा अत्याचार देश विसरणार नाही आणि वेळ आल्यावर भाजपला धडा नक्की शिकवेल, असेही नाना पटोले म्हणाले.

जे जे भ्रष्ट नेते भाजपमध्ये जातात तिथे ते स्वच्छ होतात. त्यांच्याकडे अशी कोणती वॉशींग मशीन आहे, याचा शोध आता घ्यावा लागणार आहे. भाजपमध्ये सर्व दूधाने धुतलेले आहेत का? भाजपमध्ये असे अनेक नेते आहेत, ज्यांच्याकडे पूर्वी साधी स्कूटरही नव्हती. आता त्यांच्याकडे स्वतःचे हेलिकॉप्टर आहेत. भाजप नेत्यांनी मोठमोठाले बंगले बांधले आहेत. यांच्याकडचे येवढे पैसे कुठून आले. याची चौकशी करणार नाही का, असा सवाल नाना पटोले यांनी (Nana Patole) उपस्थित केला.

Nana Patole and Kirit Somayya
Nana Patole : शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाहीत अन् त्यांच्या मित्रांचा फायदा करून देतात !

घोटाळेबाजांवर कारवाई झालीच पाहिजे. मात्र तेच घोटाळेबाज तुमच्याकडे आल्यावर स्वच्छ कसे काय होतात, याचे उत्तर कोण देईल? घोटाळेबाजांची संख्या भाजप (BJP) वाढवत आहे आणि दुसऱ्यांवर बोट दाखवत आहे. या विरोधात देशभर राज्यपाल भवनांसमोर आंदोलन केले जाणार आहे. येत्या सोमवारी १३ तारखेला मुंबईतही (Mumbai) काँग्रेस (Congress) हे आंदोलन करणार आहे. यामध्ये प्रमुख मुद्दा केंद्रीय तपास यंत्रणांच्या दुरुपयोगाचा राहणार आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in