Nana Patole News: घाबरलेल्या मोदींकडून आधी काँग्रेस नेत्यांच्या घरावर ईडीचे छापे आता पवन खेरांना अटक !

Modi Government : हे केवळ घाबरलेला हुकूमशाहच करू शकतो.
Nana Patole and Narendra Modi
Nana Patole and Narendra ModiSarkarnama

Congress Nana Patole News : भारत जोडो यात्रा ऐतिहासिक ठरली असून काँग्रेसला देशभरातून जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. छत्तीसगडच्या रायपूर येथे काँग्रेसचे महाअधिवेशन होत असून या अधिवेशनात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांना रायपूरला जात असताना विमानातून खाली उतरवून अटक करण्यात आली, हे केवळ घाबरलेला हुकूमशाहच करू शकतो, पण कितीही अडथळे आणले, तरी महाअधिवेशन होणारच, असा निर्धार नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांना रायपूरला जाण्यापासून रोखले आणि अटक केली. याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निषेध व्यक्त केला.

केंद्रातील मोदी सरकारवर पटोलेंनी तोफ डागली. नरेंद्र मोदी सरकारने देशात लोकशाही व संविधान पायदळी तुडवले आहे. हुकूमशाही कारभार सुरू आहे. काँग्रेसच्या रायपूर येथे होत असलेले महाअधिवेशन सुरळीत पार पडू द्यायचे नाही, असा चंग बांधूनच सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून नाहक त्रास दिला जात आहे. रायपूरमधील काँग्रेस नेत्यांच्या घरावर ईडीचे छापे मारण्यात आले, त्यात त्यांना काहीच मिळाले नाही.

आज दिल्लीहून काँग्रेसचे अनेक नेते रायपूरला अधिवेशनासाठी जात असताना राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांना दिल्ली विमानतळावर विमानातून खाली उतरवले. तिथेच काँग्रेस नेत्यांनी विरोध करत घोषणाबाजी केली. त्यानंतर आसाम पोलिसांची तक्रार असल्याचे सांगत पवन खेरा यांना अटक केली. मोदी सरकारची ही कृती अत्यंत निषेधार्ह व लोकशाही मूल्ये पायदळी तुडवणारी आहे, असे पटोले म्हणाले.

Nana Patole and Narendra Modi
Nana Patole : हिंदूंच्या नावाने असलेली सरकारच हिंदूंना बरबाद करीत आहे !

मोदी सरकारने (Modi Government) सर्व मर्यादा पार केल्या असून विरोधी पक्षांना दडपशाहीच्या मार्गाने संपवण्याच्या प्रयत्न केला जात आहे. काँग्रेस (Congress) पक्ष मोदी सरकारच्या अशा कारवायांना भीक घालत नाही. एकेकाळी जगातील बलाढ्य शक्ती असलेल्या जुलमी ब्रिटिशांना काँग्रेसने देश सोडण्यास भाग पाडले. हे मोदी सरकारने लक्षात ठेवावे. मोदी सरकारची कृती हुकूमशाही प्रवृत्तीचीच असून या प्रवृत्तीचा मुकाबला काँग्रेस पक्ष करेल, असेही नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com