Prafull Patel : प्रफुल्ल पटेलांनी फडणवीसांवर उधळली स्तुतीसुमने, म्हणाले..

Praful Patel : बात निकलेगी तो दूर तलक जायेगी, फडणवीसांचा सूचक वक्तव्य...
Praful Patel : Devendra Fadnavis
Praful Patel : Devendra FadnavisSarkarnama

Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा करत, स्तुतीसुमने उधळली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावले. "माझ्या मंत्रीपदाच्या काळात, चांगल्या कामांची प्रशंसा फडणवीसांनी केली. एक कर्तबगार, व्हिजनरी डायनॅमिक नेता म्हणून देवेंद्रे फडणवीस ओळखले जातात, असे पटेल म्हणाले. पटेलांच्या या वक्तव्यामागचं 'राज' काय आहे, याची आता चर्चा होत आहे.

प्रफुल पटेल गोंदियातील एका कार्यक्रमात फडणवीसांना उद्देशून म्हणाले, "आमच्या जिल्ह्याला एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहा. तुम्ही तर विदर्भाचे सुपुत्र आहात. आपल्याला एकत्र होऊन, एकसंधपणे विदर्भाचा विकास करायचा आहे. यामध्ये राजकारण कोणी आणू नये. आम्ही अजिबात आणत नाही. मी देशाचा नागरी उड्डाणमंत्री होतो. आणि त्यावेळी माझ्या माध्यमातून चांगलं काम झालं असेल, तेव्हा मला पहिला एसएमएस देवेंद्र फडणवीसांचा येत होता. ही तेव्हाची गोष्ट का सांगतोय कारण, एक माणूस दुसऱ्या माणसाची प्रशंसा करतो, आणि तो दुसऱ्या पक्षाचा असेल, तेव्हा वाटतं आपण काहीतरी चांगलं केलं, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्लं पटेल यांनी फडणवीसांवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

Praful Patel : Devendra Fadnavis
Congress : नाना पटोलेंचा ‘तो’ निर्णय कॉंग्रेस अध्यक्षांच्या सूचनेनुसारच, अतुल लोंढेंचे स्पष्टीकरण...

पटेल पुढे म्हणाले, 'आज मी पण जाहीरपणे सांगतो की, खरोखर एक कर्तबगार, व्हिजनरी डायनॅमिक नेता म्हणून महाराष्ट्राला लाभलेला नेता म्हणजे देवेंद्रे फडणवीस. या विदर्भामध्ये सगळ्यांनी मिळून एकजुटीने काम करायला पाहिजे. एकत्रित येऊन विदर्भातील भावी पिढ्यांना नवी दिशा दिली पाहिजे. हे काम आपण सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे. "

पटेलांनी केलेल्या कौतुकानंतर फडणवीस म्हणाले, "मला खूप आनंद आहे प्रफुल्ल भाई, इथे आपण मला आमंत्रित केलात. आता आपण दोघे एका मंचावर आलो आहोत तर चर्चा तर होणारच. बात निकली है तो, तो दूर तक भी जायेगी, मात्र त्याची काळजी करण्याची आता आवश्यकता नाही, असे सूचकपणे फडणवीसांनी वक्तव्य केले आहे.

Praful Patel : Devendra Fadnavis
Eknath Shinde birthday News; लवकरच रिक्षाचालकांसाठी अच्छे दिन!

फडणवीस पुढे म्हणाले, "महाराष्ट्राची ही संस्कृती आहे. राज्याच्या राजकारणात आपण वैचारिक विरोधक आहोत, व्यक्तिगत आपला विरोध नसतो. निवडणुकीत कधी कधी आपण एकमेकांचा फार विरोध करतो. मात्र विरोध करतानाही एकमेकांसोबत आपण चहा पिऊ शकतो. आपण एकमेकांसोबत एका मंचावर येऊ शकतो. जोपर्यंत आपली ही संस्कृती आहे. आपल्या विकासाला कोणी रोखू शकत नाही, असे फडणवीस म्हणाले.

फडणवीस यांनीही आपण एका मंचावर आलो, आता वेगवेगळ्या चर्चा होतील, मात्र त्याची फार काळजी करण्याची आवश्यकता नाही, असे सूचकपणे म्हंटले आहे. यामुळे पटेल आणि फडणवीस यांच्या या वेगळ्या 'यारानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा घडताना, दिसून येत आहे.

Praful Patel : Devendra Fadnavis
Jayant Patil News : चाकूरकरांनीच मला राजीव गांधींकडून पहिल्यांदा तिकिट दिले होते..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com